Full Width(True/False)

महाराष्ट्रात लॉकडाउन लागण्यापूर्वीच रणवीर- दीपिका झाले छूमंतर

मुंबई- देशभरात करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहेत. बॉलिवूडवरही त्याचा प्रभाव झालेला दिसून येतोय. ही करोना साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात १४ एप्रिलपासून पुढील १५ दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याची पूर्व कल्पना सामान्य जनतेला पूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार, अनेकांनी या दिवसांत आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. अनेक चाकरमानी एक दिवस आधीच त्यांच्या घरी पोहोचले. हाच पर्याय बॉलिवूड कलाकारांनीही निवडलेला दिसतोय. लॉकडाउनची घोषणा होताच बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता एका खास जागी रवाना झाले. लॉकडाउन लागण्यापूर्वी १४ एप्रिलच्या रात्री दीपिका आणि रणवीर यांना विमानतळावर पाहिलं गेलं. त्या दोघांनीही कपल गोल्स देत एकमेकांना मॅचिंग असे कपडे घातले होते. त्यांनी पांढऱ्या रंगाच्या टी- शर्टवर डेनिम जॅकेट घातले होते. सध्या लॉकडाउनमुळे चित्रपटांचं चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे ही सुट्टी या दोघांनीही एका खास ठिकाणी घालवायची ठरवली. मागील वर्षी झालेल्या लॉकडाउनमध्ये दीपिका तिच्या आई- वडिलांना खूप मिस करत होती. त्यामुळे यावेळेस हा लॉकडाउन त्यांनी दीपिकाच्या घरातल्यांसोबत घालवायचा ठरवला आहे. दीपिकाचे आई- वडील बंगळुरूला राहत असल्याने ते दोघेही बंगळुरूसाठी रवाना झाले. दरम्यान, दीपिका आणि रणवीर लवकरच त्यांचा आगामी चित्रपट '८३' मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा १९८३ साली विश्व कप जिंकण्याच्या प्रवासावर आधारित आहे. यात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका त्यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3txRhYF