Full Width(True/False)

माझा अपघात झाला नाहीए... व्हायरल बातम्यांवर गौतमी देशपांडे भडकली

मुंबई: '' फेम अभिनेत्री हिने व्हायरल होणाऱ्या तिच्या अपघाताच्या बातम्यांवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर गौतमीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौतमी पुण्यावरून मुंबईला येत असताना एक्सप्रेसवर तिला आलेला अनुभव सांगत आहे. पुण्याहून मुंबईकडे येत असताना लोणावळ्याच्या अलिकडे गौतमीला गाडी कंट्रोल होत नसल्याचे लक्षात आले. गाडी फार वेगात नसल्यानं तिनं गाडी डावीकडे घेतली . पण मागून येणारी एक गाडी घसरली. ये सर्व पहिल्यांदा पाहिल्यानं गौतमी घाबरली होती. त्या गाडीतील कोणालाही काही ईजा झाली नव्हती. पण तरीही तिने महामार्ग नियंत्रण कक्षाला फोन करून याबद्दल माहिती दिली होती. रस्त्यावर डिझेल सांडल्यानं गाडी स्लीप होत होत्या, असं नियंत्रण कक्षाकडून गौतमीला सांगण्यात आलं. तसंच तो रस्ता आता व्यवस्थित केल्याचंही सांगण्यात आलं. हा सर्व अनुभव भयानक असल्याचं गौतमीनं म्हटलं आहे. या व्हिडिओनंतर गौतमीचा अपघात झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यावर गौतमीनं स्पष्टीकरण दिलं आहे. मित्रांनो, माझी काळजी करू नका. माझा अपघात नाही झालाय. मी सुखरुप आहे. मी फक्त माझा अनुभव शेअर केला. जेणे करुन इतरांना काही मदत होईल. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनो हे थांबवा, असं गौतमीनं तिच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये म्हटलं आहे. गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या , 'माझा होशील ना'मधून सईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Q2Tqg8