Full Width(True/False)

कॅन्सरशी लढणाऱ्या बायकोसाठी अनुपम खेर यांनी सोडली सीरिज

मुंबई: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री या सध्या ब्लड कॅन्सरशी लढत आहेत. त्याचे पती यांनी काही दिवसांपूर्वीच ट्वीटरवर एक नोट शेअर करत किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा नावाचा एक प्रकारचा झाल्याचं आणि मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर एकीकडे किरण यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पती अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या बायकोसाठी लोकप्रिय अमेरिकन टीव्ही मालिकेला रामराम ठोकला आहे. किरण खेर यांची काळजी घेण्यासाठी अनुपम खेर त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी आपलं सर्व लक्ष आपल्या बायकोवर केंद्रित केलं असून यासाठी त्यांनी आपल्या काम सुद्धा बाजूला ठेवल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे त्यांना आपल्या बायकोला तिच्या कठीण काळात जास्तीत जास्त वेळ देता येईल. किरण खेर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी अनुपम खेर यांनी अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसीची सीरिज 'न्यू एमस्टरडम'ला रामराम केला आहे. या सीरिजमध्ये ते डॉक्टर विजय कपूर ही व्यक्तिरेखा साकारत होते. ही एक मेडिकल ड्रामा सीरिज आहे. सध्या या सीरिजचा तिसरा सीझन सुरू आहे. या सीरिजमध्ये करोना व्हायरसच्या संक्रमणाचं चित्रणही करण्यात आलं आहे. अमेरिकन सीरिज 'न्यू एमस्टरडम'मध्ये डॉक्टर विजय कपूर ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अनुपम खेर यांनी ही सीरिज सोडली असून त्यांनी त्यांच्या बेलेवू हॉस्पिटलचाही निरोप घेतला आहे. २०१८ पासून या टीव्ही सीरिजसाठी काम करत असलेल्या अनुपम खेर यांनी या व्यक्तिरेखेला सध्या पूर्णविराम दिला आहे. अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला ३५ वर्ष झाली आहेत. मागच्या वर्षी २६ ऑगस्टला अनुपम खेर यांनी किरण यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांनी आपल्याला साथ दिल्याबद्दल किरण यांचे आभार मानले होते. किरण यांनी १९८५ मध्ये अनुपम खेर यांच्याशी लग्न केलं होतं. हे या दोघांचंही दुसरं लग्न होतं. त्याआधी किरण यांचं लग्न गौतम बेरी याच्याशी झालं होतं. अनुपम आणि किरण यांचा मुलगा सिंकदर खेर सध्या बॉलिवूडमध्ये काम करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32i34yc