Full Width(True/False)

वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीवर आणखी एक संकट, हिना खानला झाली करोनाची लागण

मुंबई- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिच्या अडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. नुकतंच हिनाच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या निधनाच्या वेळेस हिना श्रीनगर येथे चित्रीकरण करत होती. त्यानंतर ती तडक मुंबईकरिता रवाना झाली होती. वडिलांना गमावल्यानंतर तिच्यावर आणखी एक संकट ओढवलं आहे. हिनाला करोनाची लागण झाली आहे. हिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे. सध्या तिने स्वतःला राहत्या घरी क्वारंटाइन करून घेतलं आहे. मुंबईत चित्रीकरण करताना हिनाला करोनाची लागण झाली. सौम्य लक्षणं आढळल्याने तिने करोना चाचणी करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने सगळ्यांना या कठीण काळात स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं. तिने पोस्ट करत लिहिलं, 'माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक वेळ आहे. माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि मी योग्य ती सगळी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी तपासणी करून घेण्याची विनंती करते. मला तुमच्या प्रार्थनांची खूप गरज आहे. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.' हिनाने वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियापासून दूर जात असल्याची घोषणा देखील केली होती. तिच्या कुटुंबासाठी हा कठीण काळ असल्याचं सांगत तिने हा निर्णय घेतला होता. यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकारांना आणि टीव्ही अभिनेत्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात अक्षय कुमार, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. या सगळ्या कलाकारांनी करोनाला यशस्वीरीत्या मात दिली. तर म्युजिक कम्पोजर श्रवण राठोड यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. नुकतंच झालं होतं हिनाच्या वडिलांचं निधन हिनालाही करोनाची लागण झाल्याने कुटुंबात चिंतेचं वातावरण अभिनेत्रीने स्वतःला केलं आहे राहत्या घरी क्वारंटाइन


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xq96er