मुंबई- अभिनय क्षेत्राला अलविदा म्हणत आता संसाराला लागली आहे. आपले वैवाहिक आयुष्य अतिशय शानदार पद्धतीने ती सध्या जगत आहे. सध्या ती आणि तिचा नवरा दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. यावेळी सनाच्या नवऱ्याने अनसने तिला एक खूप सुंदर असे सरप्राइज दिलं आहे. अनसने दिलेले हे सरप्राइज पाहून सनादेखील आश्चर्यचकीत झाली. बुर्ज खलिफामध्ये ब्रेकफास्ट दुबईतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या बुर्ज खलिफामध्ये सनाला तिचा नवरा ब्रेकफास्ट करायला घेऊन गेला. इतकेच नाही तर बुर्ज खलीफातील १२२ व्या मजल्यावरील रेस्तराँमध्ये तिच्यासाठी खास टेबल बुक केलं होतं. ब्रेकफास्टमध्ये सर्व पदार्थ लज्जतदार होतेच परंतु कॉफीची बातच काही और होती. कारण ही साधीसुधी कॉफी नव्हती तर गोल्ड प्लेटेड कॉफी होती! हे सारे फोटो सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. चविष्ट आणि जायकेदार अशा गोल्ड प्लेटेड कॉफीचा आस्वाद घेत आणि १२२ व्या मजल्यावरून दुबईचं सौंदर्य पाहतानाचे फोटो देखली सनाने पोस्ट केले आहेत. अचानक आली लग्नाची बातमी आपल्या सौंदर्याने अनेकांच्या हृदयामध्ये स्थान मिळावलेल्या सनाने अचानक अभिनयाला अलविदा केल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. एवढंच नाही तर तिच्या लग्नाची बातमीही अचानकच समोर आली होती. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. लग्नानंतर सना अनससोबत हनीमूनसाठी काश्मीरला गेली होती. तिथल्या निसर्ग सौंदर्याचे अनेक फोटो तिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पोस्ट करताना सनाने लिहिले होते की, ती आता संसाराच्या वाटेवर चालली असून ग्लॅमरस दुनियाल अलविदा केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QXpgv3