Full Width(True/False)

तूच माझं विश्व ...अभिजीत खांडकेकरने बायकोला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

मुंबई- मराठी मालिकाविश्वातील एक नावाजलेलं नाव म्हणजे . अभिजीतने खूप कमी वेळात प्रेक्षकांना आपलस करून घेतलं. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं. अभिजीत सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे आणि कुटुंबाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याची आणि सुखदाची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. ते दोघेही एकमेकांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतीच अभिजीतने त्याच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांनी त्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला. अभिजीत आणि एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी १ फेब्रुवारी २०१३ साली लग्न केलं होतं. त्यांची जोडी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुखदासाठीचं त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिलं, 'तु माझ्यासाठी माझं संपूर्ण विश्व आहेस.' असं प्रेमळ कॅप्शन देत त्याने त्यांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. चाहत्यांनीदेखील सुखदाला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे फोटो पाहून चाहत्यांनी त्याच्यावर भरपूर लाईक आणि कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. तेव्हा ते दोघे केरळला गेले होते. तेव्हाही अभिजीतने तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. अभिजीतने गुरुनाथ बनून अनेक राधिकाला भलेही त्रास दिला असेल परंतु, खऱ्या आयुष्यात मात्र त्याचं त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम आहे. सुखदादेखील अभिजीतप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करते. तिने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातदेखील भूमिका साकारली होती. उत्तम अभिनेत्रीसोबतच ती एक उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे. सुखदा आणि अभिजीत दोघेही नाशिकचे असून फेसबुकच्या माध्यमातून त्याची एकमेकांशी ओळख झाली. काही ओळखीच्या मित्रांमुळे त्यांची पहिली भेट झाली आणि पहिल्याच भेटीत ते एकमेकांना आवडू लागले. अभिजीतने 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' मधून अभिनयाची सुरुवात केली होती. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून त्याला लोकप्रियता मिळाली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31zrAKO