मुंबई: बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेता चित्रपटसृष्टीत जेवढे सक्रिय आहेत त्याहून अधिक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर अनेकदा ते प्रेरणादायी पोस्ट लिहिताना दिसतात. पण नुकतीच त्यांनी एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यावर एक विनोद शेअर केला आहे. हा विनोद इतका मजेदार आहे की, वाचल्यावर कोणालाच हसू आवरणार नाही. अमिताभ बच्चन यांनी रंगबेरंगी शर्टमधील आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी हा विनोद शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं, 'रंग अजून उतरला नाही आणि सणाचे विनोद अजूनही बंद झालेले नाहीत. अनुष्का-विराटला आदरासह. इंग्रजीमध्ये- Anushka has a huge apartment ! पण हेच हिंदीमध्ये लिहिलं तर- अनुष्का के पास विराट खोली है.' विराट आणि अनुष्कावरून अमिताभ बच्चन यांनी केलेला हा विनोद सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. विराट-अनुष्का जानेवारी २०२१ रोजी पहिल्यांदा आई-बाबा झाले आहे. त्यांनंतर ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का पुन्हा कामावर परतली आहे. अमिताभ यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्यांचे अनेक चित्रपट वर्षभरात रिलीज होणार आहेत. त्यातील 'चेहरे' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून यात ते इम्रान हाश्मीसोबत दिसणार आहे. याशिवाय रणबीर आणि अलिया यांच्यासोबत 'ब्रह्मास्त्र'मध्येही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तसेच नागराज मंजुळे यांच्या 'झुंड'मध्येही ते दिसणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mkh43m