Full Width(True/False)

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा टेक्नो स्मार्टफोनचा ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर

नवी दिल्‍ली : ब्रॅण्‍डने आज त्‍यांचा ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून बॉलिवुड सुपरस्‍टार आयुष्मान खुराणाची निवड केल्याची घोषणा केली. वाचाः मी टेक्‍नोसोबतच्‍या या सहयोगाबाबत खूपच उत्‍सुक आहे. हा स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड भारतीय ग्राहकांना अस्‍सल मूल्‍य देण्‍यासाठी स्‍थापनेपासूनच अडथळ्यांना दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत आला आहे. एक कलाकार म्‍हणून मला परिपूर्णतेचे आणि प्रेक्षकांना सर्वोत्तम मनोरंजन देण्‍याचे महत्त्व माहित आहे. टेक्‍नोने किफायतशीर दरामध्‍ये स्‍टायलिश डिझाइन्‍स व नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांनी युक्‍त सर्वोत्तम उत्‍पादने सादर करण्‍यामध्‍ये सातत्‍यता राखत भारतातील आघाडीचा स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड म्‍हणून स्‍थान प्राप्‍त केले आहे. ग्राहकांना उत्तम स्‍मार्टफोन अनुभव देण्‍यासाठी कधीच न थांबणा-या ब्रॅण्‍डसोबतचा हा सहयोग अत्‍यंत उत्‍साहवर्धक आहे, असे आयुष्मान खुराणा म्‍हणाला. वाचाः या सहयोगाबाबत बोलताना भारतातील टेक्‍नो मोबाइलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, टेक्‍नो ब्रॅण्‍ड त्‍याच्या 'नेहमीच अग्रस्‍थानी' दृष्टिकोनासाठी आणि न्‍यू भारतच्‍या मध्‍यम-बजेट विभागामधील ग्राहकांसाठी उत्तम उपलब्‍धता निर्माण करण्‍याकरिता 'सेगमेंट-फर्स्‍ट' वैशिष्‍ट्ये सादर करण्‍यावर विश्‍वास असलेल्‍या उत्‍पादन तत्त्वासाठी ओळखला जातो. या प्रवासामध्‍ये आम्‍हाला वाटले की, आयुष्मान यांच्‍या व्‍यक्तिमत्त्वामध्‍ये आमची मूल्‍ये प्रबळपणे दिसून येतात. ते भारतीय नागरिकांना वैशिष्‍ट्य-संपन्‍न स्‍मार्टफोन्‍ससह सक्षम करण्‍याकरिता आमच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये तडजोड न करणा-या आमच्‍या उद्देशाचे प्रतीक आहेत. माझा दृढ विश्‍वास आहे की, हा सहयोग आम्‍हाला व्‍यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्‍यामध्‍ये मदत करेल आणि विभागामधील आघाडीची स्‍मार्टफोन कंपनी म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ करेल. वाचाः टेक्‍नो यंदा कंपनीच्‍या उपक्रमाला पूरक साह्य म्‍हणून या सहयोगाकडे पाहते. या उपक्रमाचा किफायतशीर दरामधील नाविन्‍यपूर्ण, आधुनिक स्‍मार्टफोन्‍सच्‍या माध्‍यमातून तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍याचा मनसुबा आहे. आयुष्मान ९ एप्रि‍ल रोजी भारतामध्‍ये सादर करण्‍यात आलेल्‍या आणि १६ एप्रिल रोजी विक्रीला सुरूवात होणा-या नवीन टेक्‍नो स्‍पार्क ७ मोहिमेचे नेतृत्‍व करताना दिसण्‍यात येतील. ते स्‍पार्क, पोवा, कॅमॉन स्‍मार्टफोन सिरीजमधील मोहिमांमध्‍ये देखील दिसतील. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dkhuUP