Full Width(True/False)

Photos: न्यूयॉर्कमध्ये आलिशान घरात राहते शाहरुख खानची लेक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुहाना त्या स्टार किड्सपैकी एक आहे जिच्यावर पापाराझींचे कॅमेरे सतत रोखलेले असतात. सुहाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहतेही तिच्या लाइफ स्टाइलबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. सध्या सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. सुहानाने न्यूयॉर्कमधील घराचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ते फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. मागील वर्षी सुहानाने तिचं इन्स्टाग्राम अकाउंट पब्लिक केलं होतं. त्यानंतर तिच्या फॉलोवर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. परंतु, ती जिथे राहत आहे ते घर एखाद्या महालापेक्षा कमी नाहीए. सुहानाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिच्या घराची एक झलक नेटकऱ्यांना दाखवली आहे. सोबतच तिने तिच्या मैत्रिणीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती मैत्रिणीसोबत बाल्कनीमध्ये उभी आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती घरातील ग्लास वॉल जवळ उभी राहून फोटोसाठी पोज देत आहे. तिच्या या फोटोंवरून तिचं घर किती आलिशान आहे याचा अंदाज नेटकऱ्यांना येतो. सुहाना न्यूयॉर्कमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत पार्टी करताना दिसते. पार्टीचे अनेक फोटोदेखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सुहानाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं नसलं तरीही त्यापूर्वीच तिच्या फॉलोवर्सची संख्या लक्षणीय आहे. सध्या सुहाना अभिनय क्ष्रेत्रातील कोर्स पूर्ण करायला गेली आहे. सुहानाच्या घराचे फोटो जरी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले असले तरीही तिच्या फोटोमुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3seQSJ2