Full Width(True/False)

पैसा बोलता है! कार्तिकनं विकत घेतली लग्झरी कार, किंमत कळली का?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. त्यानंतर सोमवारी त्यानं आपण करोनातून ठीक झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. हे सर्व कोणत्या सोशल मीडिया पोस्टमुळे नाही तर कार्तिकच्या नव्या कारमुळे आहे. करोनातून ठीक झाल्यानंतर लगेचच कार्तिकनं महागडी लॅम्बोर्गिनी कार स्वतःला गिफ्ट केली आहे. ज्याची किंमत कोट्यवधीमध्ये असल्याचं बोललं जात आहे. कार्तिक आर्यनच्या कार कलेक्शनमध्ये आता सर्वात पुढे त्याची नवी कोरी ब्लॅक लॅम्बोर्गिनी उभी असलेली दिसणार आहे. या कारची किंमत भारतात ३.१५ कोटी ते ३.४३ कोटी रुपये एवढी असल्याचं बोललं समजतं. कार्तिकचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यानं लगेचच त्याची नवी कार घरी आणली आहे. कार्तिकच्या या कारचे फोटो सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसं पाहायला गेलं तर अशी महागडी कार खरेदी करण्याची ही कार्तिकची पहिली वेळ नाही. त्याच्याकडे या आधीही अनेक महागड्या आणि लग्झरी कारचं कलेक्शन आहे ज्यात आता लॅम्बोर्गिनीची भर पडली आहे. कार्तिकच्या कार कलेक्शनमध्ये मिनी कूपर, बीएम डब्ल्यू 5(BMW 5 ) अशा गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे रॉयल एनफील्ड बाइक सुद्धा आहे. तसेच वर्सोवामध्ये त्याचं स्वतःचं घरही आहे जे त्यानं त्याच्या बॉलिवूड स्ट्रगल काळातच भाड्यानं दिलेलं आहे. कार्तिकनं त्याच्या नव्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कार्तिकच्या या नव्या कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. एकीकडे त्याचे चाहते या कारसाठी त्याचं अभिनंदन करत आहेत तर काही लोक मात्र करोना काळातील त्याच्या कमाई बद्दल विचार करत आहेत. एका युझरनं या फोटोंवर 'पैसा ही पैसा' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या युझरनं, 'तू तर हेवी ड्रायव्हर निघालास. सरळ Urus खरेदी केली.' अन्य एका युझरनं कमेंटमध्ये लिहिलं, 'लॅम्बोर्गिनी खरेदी करण्याएवढे याचे चित्रपट तरी किती रिलीज झाले.' याशिवाय काही युझर्सनी त्याला कार न घेता घर घेण्याचा सल्ला सुद्धा दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dHbK6v