Full Width(True/False)

अजय देवगणची चाहत्यांना खास भेट, समोर आला 'आरआरआर' मधील लुक

मुंबई- बॉलिवूड अभिनेता गेली अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य करत आहे. त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं. अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अजयच्या चाहत्यांची संख्यादेखील कोटींमध्ये आहे. आज २ एप्रिल रोजी अजय त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयने चाहत्यांना वाढदिवसादिवशी त्याच्या आगामी '' चित्रपटामधील लुक प्रदर्शित करण्याचं आश्वासन दिलं होतं. चाहत्यांना दिलेला शब्द पाळत त्याने त्याचा लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याचा चित्रपटातील जबरदस्त लुक पाहून चाहतेही आनंदित झाले आहेत. चित्रपट 'आरआरआर' मधून अजय तेलगू चित्रपटात पदार्पण करणार आहे. त्याने या चित्रपटातील लुक एका मोशन पोस्टरद्वारे चाहत्यांसमोर आणला आहे. या चित्रपटातील त्याचा लुक त्याच्या इतर अॅक्शन चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. तो एका लढवय्याप्रमाणे दिसत आहे, जो इंग्रजांच्या सैनिकांशी दोन हात करायला तयार आहे. अजयने चाहत्यांना २ एप्रिलला लुक प्रदर्शित करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचा लुक पाहायला चाहतेही प्रचंड उत्साहित होते. आता जेव्हा त्याचा लुक सगळ्यांसमोर आला आहे, तेव्हा प्रेक्षकांमधली या चित्रपटाबद्दची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या चित्रपटात अजयसोबत आलिया भट्टदेखील तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाच्या वाढदिवसाला चित्रपटातील फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात आलिया सीतेची भूमिका साकारणार आहे. ती दाक्षिणात्य अभिनेता रामचरणसोबत दिसणार आहे. तर ज्युनिअर एनटीआर अभिनेत्री ओलिव्हिया सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मल्टीस्टारर चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित केला जाऊ शकतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wj0ENn