मुंबई- अवघ्या महिन्याभरापूर्वी दिया मिर्झा हिने वैभव रेखी याच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर लगेचच दियाने असल्याची बातमी आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या गेल्या आहेत. प्रेग्नंट असल्यामुळेच दियाने लग्न केले असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. लग्नाआधीच प्रेग्नंट राहणारी दिया ही काही पहिली अभिनेत्री नाही. याआधीही बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. त्यातील काहींनी लग्न केले तर काही अभिनेत्रींनी लग्न न करताच सिंगल पॅरेन्टिंग स्वीकारले आहे. नेहा धुपिया- नेहा धुपिया हिने बॉलिवूड सिनेमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा धुपिया आणि अंगद बेदी हे दीर्घ काळ रिलेशनमध्ये होते. अखेर १० मे २०१८ मध्ये त्यांनी दिल्लीतील गुरुद्वारात जाऊन लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनीच नेहा प्रेग्नंट असल्याची बातमी समोल आली होती. याबद्दलचा खुलासा खुद्द नेहानेच 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमातून तिने केला होता. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट असल्याचे नेहा आणि अंगद यांनी मान्य केले होते. कल्की कोचलिन- अभिनेत्री कल्कि कोचलिन ही निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यप याची पहिली बायको. अनुरागशी घटस्फोट घेतल्यानंतर कल्की इस्रायली क्लासिकल पियोनिस्ट गाय हर्शबर्ग याच्यासोबत लिव्ह- इन रिलेशनमध्ये आहे. या दोघांनी अजून लग्न केलेले नाही परंतु त्या दोघांना एक मुलगी आहे. गॅब्रिएला डेमेट्रिएड्स - अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड मॉडेल गैब्रिएला डेमेट्रिएड्स यांना १८ जुलै २०२० मध्ये मुलगा झाला. अर्जुन रामपाल याने त्याची पहिली बायको मेहर हिला घटस्फोट दिला आहे. पहिल्या बायकोपासून त्याला दोन मुली आहेत. अर्जुन आणि गैब्रिएला डेमेट्रिएड्स यांनी लग्न केलेले नसले तरी ते एकत्र राहतात. श्रीदेवी- ख्यातनाम दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी या देखील बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्याआधी प्रेग्नंट असल्याची त्या काळात चर्चा होती. त्यामुळेच पहिल्यापासून विवाहित असलेल्या बोनी कपूर यांच्याशी त्यांनी घाईने लग्न केले. बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्याआधी श्रीदेवी यांनी त्या प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते, खुलेपणे सांगणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. ज्यावेळी श्रीदेवी यांनी लग्न केले त्यावेळी त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. नीना गुप्ता- ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या देखील लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. नीना गुप्ता या ख्यातनाम क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनमध्ये होत्या. विवियन यांनी पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नीना यांचे लग्न झाले नाही. परंतु विवियन यांच्यापासून झालेल्या मुलीला, मसाबा हिला त्यांनी जन्म देऊन एकटीने वाढवले. नताशा स्टेनकोविकः नताशा स्टेनकोविक हिने गेल्या वर्षी हार्दिक पांड्यासोबत लग्न केले, त्यावेळी नताशा प्रेग्नंट होती. करोनामुळे या दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केले आणि त्याची घोषणा सोशल मीडियावर केली. त्याचवेळी ते आई-वडील होणार असल्याचेही सांगितले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dpcqxi