Full Width(True/False)

घरबसल्या 'राधे' पाहायला सलमानच्या चाहत्यांना प्रत्येकवेळी मोजावे लावणार पैसे

मुंबई- अभिनेता सलमान खानचा '' चित्रपट १३ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहेत. 'राधे' एकाच वेळेस ४० देशांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. करोनामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांपर्यंत जाऊ शकत नसल्याने चित्रपटच आता प्रेक्षकांच्या घरी येणार आहे. चित्रपटगृहांसोबतच हा चित्रपट झी५ च्या झी प्लेक्स, डिश टीव्ही, डी टू एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्ही वर 'पे पर व्हीव्यू' तत्वावर प्रदर्शित होणार आहे. याचाच अर्थ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत. किती असणार तिकीटाची किंमत तुम्ही चित्रपट कितीही वेळा पाहा परंतु, चित्रपटगृहांप्रमाणे ओटीटीवर देखील तुम्हाला प्रत्येकवेळी तिकीट खरेदी करावं लागणार आहे. झी प्लेक्स वर चित्रपट पाहण्यासाठी तिकिटांची बुकिंग सुरू झाली असून प्रेक्षकांना तिकिटासाठी २४९ रुपये द्यावे लागणार आहेत. १३ मे रोजी प्रदर्शित होणार हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील तिकिटांची किंमतदेखील लवकरच ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर तिकिटांची बुकिंग सुरु करण्यात येणार आहे. घरी पाहण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीची गरज 'राधे: योर मोस्‍ट वॉन्‍टेड भाई' चित्रपट घरबसल्या पाहण्यासाठी प्रेक्षकांना सगळ्यात आधी मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीवर झी प्लेक्स, डिश टीव्ही, डी टू एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्ही यापैकी एक अँप डाउनलोड करावा लागेल. तुम्ही लॅपटॉपवरून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या साइटवर जाऊन 'राधे' साठी बुकिंग करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे झीप्लेक्स अँप असेल तर तुम्ही अँपमधील 'राधे' चित्रपटाच्या बॅनरवर क्लिक करून २४९ रुपये भरून चित्रपट बुक करू शकता. तुम्हाला जेव्हाही चित्रपट पाहायचा असेल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला नव्याने २४९ रुपयांचं तिकीट खरेदी करावं लागेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tYSyrN