मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यानं बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या त्याच्या यादीत बरेच चित्रपट आहे आणि त्यापैकीच एक आहे शकुन बत्राचा आगामी चित्रपट. या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही अशात सिद्धांतनं दिग्दर्शकाकडून या चित्रपटाचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पण त्याचा रिझल्ट मात्र खूपच मजेदार होता. सिद्धांतनं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो दिग्दर्शक शकुन बत्राला आगामी चित्रपटाचं नाव विचारत असताना दिसत आहे. पण दिग्दर्शकाकडे याचं उत्तर नसतं. त्यावर सिद्धांत सरळ जाऊन त्याचा गळा पकडतो आणि त्याला खाली आपटतो. अर्थात हे सर्व मजेदार अंदाजात घडलं आणि याच्या बॅकग्राउंडला '३ इडियट्स'मधील 'बहती हवा सा था वो' हे गाणं प्ले होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सिद्धांतनं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आणखी एक प्रयत्न अयशस्वी ठरला. जो पर्यंत हे समजत नाही तोपर्यत आपल्याला आता शकुन बत्राचा आगामी चित्रपट असंच म्हणावं लागणार असं वाटतंय.' शकुन बत्राच्या या आगामी चित्रपटात सिद्धांत व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, अनन्या पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मागच्या वर्षी लॉकडाऊन संपल्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग गोव्यात करण्यात आलं होतं. मात्र याचं नाव अद्याप ठरवण्यात आलेलं नाही. दीपिका, अनन्या आणि सिद्धांत एकाच चित्रपटात एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rRvaKK