Full Width(True/False)

प्रेम करता मग का लपवता? हंसल मेहतांच्या ट्वीटवर कंगनाचं उत्तर

मुंबई- बॉलिवूडची 'धाकड' अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ती नेहमीच तिच्या हजरजबाबी बोलण्याने समोरच्याचं तोंड बंद करत असते. नुकताच तिच्या '' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कंगनाच्या या सिनेमाची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसते. पण यावेळी कंगना सिनेमामुळे नाही तर तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. कंगनाने यांच्या ट्वीटवर उत्तर देत त्यांना एक प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न पाहून नेटकऱ्यांनीही त्यांची थट्टा उडवण्यास सुरुवात केली. तर काहींनी कंगनाचं कौतुक केलं. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माते हंसल मेहता यांनी कंगनाबद्दल एक ट्वीट केलं होतं. ट्विटरवरील रोजी रोटी या ट्विटर हॅण्डलवरून एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी विचारलं, 'आजच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत अशी कोणती अभिनेत्री आहे जी सगळ्यात चांगली आहे. उत्कृष्ट आहे. जिला कोणत्याही पुराव्याची गरज नाही.' या ट्वीटवर हंसल यांनी कंगनाचा एक फोटो पोस्ट केला होता. हे पाहून कंगनानेदेखील त्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. तिने लिहिलं, 'मला माहीत होतं तुम्ही प्रेम तर करता, पण माहीत नाही का सगळ्यांपासून लपवून ठेवता.' कंगनाचं हे ट्वीट अनेकांना आवडलं आहे. तिच्या हंसल यांना प्रतिक्रिया देण्याची पद्धत अनेकांना पसंत पडली. तर दुसरीकडे अनेक नेटकरी हंसल यांची थट्टा करत आहेत. एका युझरने लिहिलं, 'कोण म्हणतं खोट्याला पाय नसतात.. मला तर हात, पाय, तोंडासोबत दीड फूट लांब सफेद दाढीपण दिसतेय.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं , 'एकतर्फी प्रेम.' लवकरचं कंगनाचा 'थलायवी' चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यासोबत ती 'धाकड' आणि 'तेजस' मधेही दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PQYL9Q