Full Width(True/False)

..म्हणून अजय देवगण वाढदिवसाला केक कापत नाही; त्यानेच सांगितलं कारण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि डँशिंग अजय देवगण त्याचा आज साजरा करत आहे. एखाद्या अभिनेत्या वाढदिवस म्हटला की मोठ्ठ सेलिब्रेशन, केक, पार्टी असा तामझाम असणे अगदीच स्वाभाविक आहे. परंतु त्याच्या वाढदिवसाला कधीच मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करत नाही. इतकेच नाही तर त्याच्या वाढदिवसाला तो केक देखील कापत नाही. वाचून आश्चर्य वाटेल परंतु हे खरेच आहे. अजयने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजयने स्वतः आपण वाढदिवसाच्या दिवशी केक कापत नसल्याचं सांगितले होते. त्या मागचे कारण विचारले असते अजयने सांगितले की, ' मुळातच मी फार शांत स्वभावाचा आहे. त्यामुळेच वाढदिवसाच्या दिवशी जंगी पार्टी करावी असे मला कधीच वाटत नाही.' या मुलाखतीमध्ये अजयने पुढे असे ही सांगितले की,' वाढदिवसाच्या दिवशी मी ऑफिसमध्ये किंवा शुटिंगमध्य जेव्हा असतो तेव्हा तिथले लोक केक आणतात आणि तो कापतात. मात्र ज्यावेळी मी घरी असतो तेव्हा मी ही जबाबदारी माझ्या मुलांकडे असते. खरे तर मी वाढदिवसाच्या दिवशी फार काही उत्साहात नसतो. परंतु आणि माझी आई नेहमी या दिवशी माझ्यासाठी काहीतरी खास करण्याच्या प्रयत्नात असतात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्या घरीच छोटी पार्टी साजरी करतात.' सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता या पार्श्वभूमीवर अजयने लवकरच सर्व काही पहिल्याप्रमाणे होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ज्यांचे आयुष्य कोरोनामुळे विस्कळित झाले आहे त्यांचे आयुष्य योग्य पद्धतीने मार्गी लागावीत अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. दरम्यान अजयचे भूज, मैदान तसंच आरआरआर हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचप्रमाणे अजय संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठावाडी सिनेमात देखील छोटीशी भूमिका साकारणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fyYvY7