मुंबई: बॉलिवूड अभिनेते यांची मुलगी कृष्णा श्रॉफनं आपल्या भावाप्रमाणे बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. कृष्णा सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. जे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच कृष्णानं काही बिकनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यावरून एका युझरनं कृष्णाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णानं या युझरला सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे. कृष्णा श्रॉफनं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले होते. ज्यात ती बिकीनीमध्ये दिसली होती. हा फोटो शेअर करताना कृष्णानं स्वतःला 'वाइल्ड चाइल्ड' म्हटलं होतं. तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं होतं पण एका युझरनं मात्र तिच्या या फोटोंवर कमेंट करताना तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या युझरनं कृष्णाच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, 'तुझा भाऊ टायगर किती चांगला आहे आणि तू तेवढीच वाईट आहेस. तुला लाज वाटत नाही. तुझे हे फोटो आई-बाबा पाहात नाहीत का?' या युझरला सडेतोड उत्तर देत कृष्णानं त्याची बोलतीच बंद केली आहे. कृष्णानं या ट्रोलरच्या कमेंटवर रिप्लाय करताना लिहिलं, 'ही चिंता व्यक्त केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार पण तू नरकात जा' यापुढे कृष्णानं लिहिलं, 'कोणीतरी माझा मेसेज त्याला ट्रान्सलेट करून सांगा' कृष्णाच्या या बिनधास्त उत्तरानं सर्वांची मनं जिंकली आहेत. कृष्णाला अशा प्रकारे ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेकदा बिकनी फोटोंवरून तिला ट्रोलिंग समोरं जावं लागलं आहे. आणि यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. हे दोघंही नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. कधी जिममध्ये वर्कआऊट करचानाचे तर कधी डान्स करतानाचे या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dWNaP2