मुंबई: भारतातील करोना रुग्णांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आणि करोनाची स्थिती तर दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं २०२० पेक्षा २०२१ मध्ये सर्वात जास्त नुकसान केलं आहे. अनेकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणि बेडची कमतरता भासत आहे आणि दुसरीकडे लसीकरणालासुद्धा सुरुवात झाली आहे. अशात आता अभिनेत्री प्रियांकानं सुद्धा भारताच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तिनं ट्विटरवरून अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे भारताची मदत करण्याची मागणी केली आहे. भारत सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना करोना प्रतिबंधक लस देण्याची परवानगी दिली आहे. पण वाढत्या करोना रुग्णांमुळे देशातल्या अनेक रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रियांका चोप्रानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'मला खूप वाईट वाटत आहे. भारत सध्या करोना व्हायरसशी लढत आहे आणि अमेरिकेकडून त्यांनी ५५० मिलियन लसींची ऑर्डर केली आहे. जगभरात लस पोहोचवण्यासाठी अॅस्ट्राजेनिकाचे आभार, पण माझा देश आज खूपच बिकट परिस्थितीत आहे. कृपया तुम्ही भारताला लवकरात लवकर लस देऊ शकता का?' सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सामाजिक कार्यातही वेळोवेळी सहभाग घेताना दिसते. ती सर्वांना नेहमीच मदत करताना दिसते. मागच्या काही दिवसांतील भारतीचा परिस्थिती पाहता. ती सोशल मीडियावर सातत्यानं यावर भाष्य करताना दिसत आहे. ज्यात औषधांची आणि ऑक्सिजन सिलेंडर बाबत माहिती दिलेली आहे. सध्या प्रियांका चोप्रा तिचा आगामी चित्रपट 'सिटाडेल'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PwA1UQ