Full Width(True/False)

खायचे अॅपल ऑर्डर केले तर सामानात मिळाला आयफोन, पाहा कुठे अन् कसे घडले

नवी दिल्लीः केला अन् साबण मिळाला, अशा बातम्या तुम्ही याआधी वाचल्या असतील परंतु, एका व्यक्तीने खायचे अॅपल ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर त्या व्यक्तीला सामानात आयफोन मिळाला आहे. यूकेतील एका ५० वर्षीय व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. वाचाः निक जेम्स नावाच्या या व्यक्तीने वरून काही सामान ऑर्डर केले होते. सुपरमार्केट्सचा एक भाग आहे. ऑर्डर दरम्यान जेम्सने आपल्या किराना सामानात अॅपल लिहिले होते. ज्यावेळी जेम्स आपले ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना त्यांच्या सामानात सफरचंदच्या जागी अॅपल कंपनीचा आयफोन SE दिसला. हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हे असं कसं झालं या विचारात जेम्स पडले. त्यांनी पुन्हा एकदा किरानाच्या सामानाची लिस्ट चेक केली. अकाउंट्सवरून फक्त सफरचंदाचे पैसे कापले होते. म्हणजेच आयफोन फ्री मिळाला होता. वाचाः स्टोरने फ्री दिला आयफोन सर्व माहिती मिळाल्यानंतर जेम्सला माहिती पडले की, यात स्टोरची कोणतीही चूक नाही. स्टोरने ग्राहकांना सुखद धक्का देण्यासाठी आयफोन दिला होता. ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा हेतू आहे, असे म्हणत टेस्को असे अनेक गिफ्ट ग्राहकांना वाटत असते. टेस्कोने यावेळी हे सरप्राइज जेम्स यांना दिले होते. वाचाः जेम्सने मानले आभार ट्विटरवर जेम्ने टेस्कोला टॅग करुन आभार मानले आहे. टेस्को आणि टेस्कोमोबाइल तुमचे आभार. बुधवारी सायंकाळी मी आपले ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी गेलो होते. परंतु, माझ्या सामानात ओरिजनल सफरचंद ऐवजी आयफोन एसई पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. हे पाहून माझा मुलगा खूपच आनंदी झाला आहे, असे जेम्सने ट्विटरवर म्हटले आहे. वाचाः स्टोरने याआधीही असे केलेले आहे टेस्को नेहमीच असे करीत आलेले आहे. आणखी एका युजरचे नाव क्रिस्टी मॅरी आहे. तिने सांगितले की, ज्यावेळी मी सामान खरेदी करण्यासाठी स्टोरवर गेले. त्यावेळी मला एयरपॉड्स मिळाले होते. आपल्या नोटमध्ये टेस्कोने लिहिले होते की, टेस्को तुमची ऑर्डर कलेक्ट करताना तुम्हाला काही जिंकण्याची संधी देते. यात आयफोन एसई पासून सॅमसंग गॅलेक्सी टॅब ७ आणि नोकियाच्या फोनचा समावेश आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mStpvZ