Full Width(True/False)

तमिळ अभिनेता विवेक यांचे निधन; २०० हून अधिक सिनेमांत केले काम

मुंबई : तमिळ सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. विवेक यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले होते. ते ५९ वर्षांचे होते. अभिनेता विवेक यांना शुक्रवारी, १६ एप्रिल रोजी सकाळी छातीत दुखल्याने ते घरातच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तातडीने चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगत त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. विवेक यांनी १५ एप्रिलला करोनाचे पहिली लस घेतली होती. यासंबंधीची माहिती त्यांनी मीडियाला दिली होती. ही लस त्यांनी सरकारी हॉस्पिटलमधूनच घेतली होती. त्यामागचे कारण सांगताने ते म्हणाले, 'करोनाची लस घेणं सुरक्षित आहे. ही लस घेतली म्हणजे आपण आजारी होणार नाही असे समजू नका. आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. फक्त लस घेतल्याने करोनाचा धोका कमी झालाय इतकेच.' विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या विवेक यांनी रजनीकांत, कमल हासन, अजित, विजय, माधवन आणि विक्रम संग यांच्यासोबत काम केले होते. माधवन बरोबर केलेल्या 'रन' सिनेमाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. विवेक यांना सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. दरम्यान, विवेक यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळ सिनेसृष्टीतील कलाकारांनी, राजकारणी नेत्यांनी तसेच त्यांच्या अनेक चाहत्यांनी विवेक यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RzsR2A