Full Width(True/False)

'वडिलांचे पैसे वाया घालवतेयस' म्हणणाऱ्या ट्रोलरला साराचं उत्तर

मुंबई: मास्टर ब्लास्टर यांची मुलगी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते एखाद्या बॉलिवूड सेलिब्रेटीपेक्षा कमी नाहीत. सारा नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करताना दिसते. ज्याला तिच्या चाहत्यांची खूप पंसती सुद्धा मिळते. पण सचिनची मुलगी म्हणून तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. नुकतीच सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यामुळे तिला एक महिला युझरनं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण सारानं तिला सडेतोड उत्तर देत तिची बोलतीच बंद केली आहे. सारानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिनं गाडीमध्ये कॉफी मग पकडलेला दिसत होता. यावर कमेंट करताना एका महिला युझरनं लिहिलं, तू तुझ्या वडिलांचे पैसे वाया घालवत आहेस. या युझरच्या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे आणि यासोबतच या युझरला तिनं दमदार उत्तरही दिलं आहे. सारानं इन्स्टाग्रामवर या युझरच्या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअऱ करताना लिहिलं, 'कॅफिनवर जे पैसे खर्च होतात ते कधीच वाया जात नाहीत ते चांगल्यासाठीच खर्च होतात. मग ते कोणाचेही असो.' साराच्या चाहत्यांना साराचा हा उत्तर देण्याचा अंदाज खूपच आवडला आहे. अर्थात या स्क्रिनशॉटवरुन हे सुद्धा समजतं की या युझरनं साराला या आधीही अर्जुन तेंडुलकरवरुनही ट्रोल केलं होतं. त्यावेळी सारानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण आता मात्र तिनं या युझरला सडेतोड उत्तर देत तिची बोलती बंद केली आहे. सारा तेंडुलकर ट्रोलिंग शिकार होणं हे तसं पाहायला गेलं तर फार कमी वेळा घडतं. या उलट अनेकदा तिचे चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुकच करताना दिसतात. साराचं सौंदर्य तर कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीलाही लाजवेल असं आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो नेहमीच बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारे ठरतात. मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेल्या साराचा चाहता वर्ग मात्र कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3afulFB