Full Width(True/False)

निर्मिती, राष्ट्रीय पुरस्कार; सुमित्रा भावेंची गाजलेली कारकिर्द

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शिका आणि निर्मात्या यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयत अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७८ व्या वर्षी सुमित्रा भावे यांची प्राणज्योत मालावली. अनेक राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरणाऱ्या सुमित्रा भावे यांची कारकिर्द खूप गाजली. आपल्या करिअरच्या काळात त्यांनी अनेक उत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि या चित्रपटांना विविध पुरस्कारही मिळाले. सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. 'बाई', 'पाणी' या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये 'दोघी' हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'संहिता', 'एक कप च्या', 'घो मला असला हवा', 'कासव', 'अस्तु' हे चित्रपट गाजले. 'दिठी' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. सुमित्रा भावे यांचे चित्रपट राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतही नावाजले गेले. त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. 'विचित्र निर्मिती' या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले. याशिवाय राधिका आपटेसारखी दमदार अभिनेत्रीसुद्धा अभिनय क्षेत्राला सुमित्रा भावे यांच्यामुळेच मिळाली. सुमित्रा भावे कशा आल्या सिनेक्षेत्रात पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या. सुमित्रा भावे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RMEHXm