नवी दिल्लीः स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सचे सीजन सुरू आहे. या यादीत आता Samsung ने अपनी फ्लॅगशिप सीरीज मोबाइल्सवर कॅशबॅक सह अनेक ऑफर्सची घोषणा केली आहे. यानंतर आता Samsung Galaxy S21+ ची किंमत १२ हजार रुपयांपर्यंत कमी होते. आणि वर सुद्धा हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. वाचाः गॅलेक्सी S21+ सोबत गॅलेक्सी वॉच अॅक्टिव २ किंवा गॅलेक्सी बड्स प्रोवर सूट मिळू शकते. सॅमसंगने गॅलेक्सी S21, गॅलेक्सी S21+ आणि गॅलेक्सी S21 अल्ट्राला जानेवारी २०२१ महिन्यात लाँच केले होते. सॅमसंगने गुरुवारी ही घोषणा केली आहे. ग्राहकांना गॅलेक्सी S21+ ला ७६ हजार ९९९ रुपयांत खरेदी केल्यास ५ हजार रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक दिला जात आहे. सॅमसंग ऑनलाइन स्टोर, एक्सक्लूसिव स्टोर आणि दुसऱ्या लीडिंग ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर्सच्या मदतीने ग्राहकांना ७ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकते. गॅलेक्सी S21+ ला सॅमसंगच्या वेबसाइटवर ७६ हजार ९९९ रुपायंत विकले जात आहे. कॅशबॅकनंतर या फोनची किंमत ६४ हजार ९९९ रुपये होते. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस सोबत तुम्ही Galaxy Watch Active 2 किंवा Galaxy Buds Pro खरेदी केल्यास स्मार्टवॉच किंवा ईयरबड्स तुम्हाला केवल ९९० रुपयांत मिळू शकेल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wIxR4Y