नवी दिल्लीः टेक्नोने आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Tecno Camon 17 ला लाँच केले आहे. हँडसेटचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी MediaTek Helio G85 SoC आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. जाणून घ्या फोनची किंमत आणि लेटेस्ट टेक्नो मोबाइल फोनची सर्व वैशिष्ट्ये. वाचाः Tecno Camon 17 चे फीचर्स या स्मार्टफोनध्ये ६.५५ इंचाचा एचडी (720*1600 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज दिला आहे. सेल्फीसाठी कॅमेरासाठी फोनमध्ये फ्रंटमध्ये पंच होल कटआउट दिसत आहे. वाचाः प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ चिपसेटचा वापर केला आहे. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीची इंटरनल स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चाार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 आउट ऑफ द बॉक्स वर आधारित हाईओएस कस्टम स्किनवर काम करतो. वाचाः मायस्मार्टप्राईसच्या माहितीनुसार, फोनला दोन व्हेरियंट मध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत १५ हजार ७५० रुपये तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत अजून सांगण्यात आली नाही. फोनला तीन कलर मध्ये लाँच केले आहे. डीप सी, फ्रॉस्ट सिल्वर आणि Tranquil Greenमध्ये उपलब्ध केले आहे. या फोनला कंपनीने सध्या केनिया मध्ये लाँच केले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32OGvkQ