Full Width(True/False)

बाबो! १३ कोटी ४१ लाखांना विकला गेला कान्ये वेस्टचा एक बूट, असं आहे तरी काय या बुटामध्ये?

मुंबई- लोकप्रिय हॉलिवूड त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. त्याने नुकताच हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियनसोबत घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे त्या दोघांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते. परंतु, आता मात्र कान्ये एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. त्याचा एक काळा बूट चक्क १. ८ मिलियन डॉलरला विकला गेला आहे. कोणत्याही स्निकर बुटांच्या विक्रीमध्ये ही किंमत सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, स्निकर बुटांच्या विक्रीच्या बाबतीत ही किंमत विक्रमी मानली जातेय. हा बूट चक्क १३ कोटी ४१ लाखांना विकला गेला आहे. या बुटांच्या विक्रीमुळे एक नवीन रेकॉर्ड बनला आहे. या बुटांची खास गोष्ट अशी की, हे बूट ब्रॅण्ड चे असून कान्येने ते २००८ सालच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान घातले होते. या बुटांमध्ये त्याने 'हे मामा' आणि 'स्ट्रॉन्गर' या गाण्यांवरसादरीकरण केलं होतं. खरं तर, स्निकर शूज नाइकी कंपनी आणि कान्येमध्ये एक ठराव झाला होता. त्यानुसार, या बुटांच्या मॉडेलला २००९ पर्यंत विक्रीसाठी बाजारात आणलं गेलं नव्हतं. कान्येने या बुटांची जोडी RARES मधून खरेदी केली होती. हे एक स्‍नीकर इनवेस्‍टमेंट मार्केटप्‍लेस आहे आणि इथे लोकांना अनेक जुन्या आणि दुर्मिळ बुटांची खरेदी करण्याची संधी मिळते. अमेरिकेचा माजी फुटबॉलपटू गेरोम सैप याने मार्च महिन्यात RARES मधून या बुटांची खरेदी केली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये याच ब्रॅण्डच्या Nike Air Jordan 1s बुटांनी सगळ्यात जास्त किमतीला विकले जाण्याचा रेकॉर्ड बनवला होता. त्या बुटांना ६. १५ लाख डॉलर इतकी किंमत मिळाली होती. परंतु. कान्येच्या बुटांना मिळालेली किंमत त्या बुटांच्या तीनपट अधिक आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QyJFXq