Full Width(True/False)

VIDEO: अरे बाबा जाऊद्या मला...पापाराझीला पाहून हिना खान पळाली

मुंबई: अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ होताना दिसतेय. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्समध्ये तिनं काही दिवसांपूर्वी १ कोटींचा टप्पा पार केला. सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओजमुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हिना खान पापाराझीला पाहून पळताना दिसते. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरचा आहे. या व्हिडिओमध्ये हिना सुरूवातीला पापाराझी फोटोग्राफर्संना पोज देताना दिसते. परंतु नंतर तिला निघायचं असल्यानं ती पापाराझीला 'प्लिज मला जाऊ द्या' अशी विनंती करताना दिसते. परंतु फोटोग्राफर्स हिनाला गॉगल काढून पोज देण्याची विनंती करतात.पण ती घाईत असल्यानं पळत सुटते आणि गाडीत जाऊन बसते. या व्हिडिओत विशेष म्हणजे हिना फोटोग्राफर्सवर चिडचिड करताना , ओरडताना दिसत नाही. ती हसत-हसत फोटोग्राफर्संसोबत संवाद साधते. त्यामुळं चाहत्यांनी देखील या व्हिडिओवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिना तिच्या अनोख्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. तिच्या प्रत्येक लुकची नेहमी चर्चा होते. 'बिग बॉस'मध्ये असताना देखील तिच्या प्रत्येक लुकला अनेकींनी फॉलो केलं होतं. कोटींच्या घरात फॉलोअर्स असलेल्या काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी आता हिनाही एक आहे. काही दिवसांपूर्वी हिनानं एका खास पार्टीचं आयोजन करुन आपल्या मित्र-मंडळींसोबत हा आनंदाचा क्षण साजरा केला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gd9XZU