Full Width(True/False)

64MP कॅमेऱ्याचा Xiaomi चा स्वस्त फोन येतोय, १३ मे रोजी फोनची लाँचिंग

नवी दिल्लीः चीनची कंपनी शाओमी यावर्षीच्या सुरुवातीला रेडमी नोट १० स्मार्टफोन सीरीज लाँच केली होती. आता कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. यात AMOLED डिस्प्ले, पंच-होल डिजाइन आणि MediaTek Helio G95 सारखे फीचर्स देण्यात येणार आहेत. या नवीन फोनची लाँचिंग १३ मे रोजी होणार आहे. रेडमी इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या फोनची घोषणा केली आहे. फोनची लाँचिंग एका इव्हेंटमधून करण्यात येणार आहे. रेडमी नोट १० एस स्मार्टफोनला कंपनी मार्च महिन्यात ग्लोबली आणले आहे. वाचाः भारतात किती असेल किंमत भारतात या फोनची किंमत किती असेल याची माहिती साठी आपल्याला लाँचिंग पर्यंत वाट पाहावी लागेल. रिपोर्टच्या माहितीनुसार, Redmi Note 10sला १२ हजार रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकते. नुकत्याच आलेल्या टीजरवरून हे स्पष्ट संकेत मिळत आहेत की, फोनला तीन कलर ऑप्शन ब्लू, डार्क ग्रे, आणि व्हाइट मध्ये लाँच करण्यात येणार आहे. वाचाः Redmi Note 10S चे संभावित फीचर्स फोनला ग्लोबली व्हेरियंटशी तुलना केल्यास या फोनमध्ये ६.४३ इंचाचा अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन (1,080×2,400 पिक्सल) चा डिस्प्ले असणार आहे. यात ८ जीबी पर्यंत रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आणि MediaTek Helio G95 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा अँड्रॉयड ११ वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. वाचाः फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PKnOMc