Full Width(True/False)

सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसला चोर, झटापटीत वडील जखमी

मुंबई: मराठी अभिनेत्री हिच्या पुण्यातील घरी चोरीचा प्रयत्न झाला असून या चोराशी झालेल्या झटपटीत सोनालीचे वडील जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका इसमानं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. मंगळवारी (२५ मे) सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे हा प्रकार घडला. चोरट्याच्या हल्ल्यात जखमी सोनालीच्या वडिलांच्या हाताला टाके पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निगडी- प्राधिकरण येथे ‘वरलक्ष्मी’ बिल्डींग आहे. येथे सकाळी एक चोरटा चाकू, प्लास्टिकची पिस्तुल घेऊन इमारतीच्या आत घुसला. त्यानंतर समोर आलेल्या एका महिलेवर त्याने स्प्रे मारला. त्यानंतर चोरटा दुसऱ्या मजल्यावर गेला. या ठिकाणी सोनाली कुलकर्णीचे कुटुंबीय राहतात. सोनालीचे वडील व चोर यांच्यात झटापट झाली. यावेळी चोराने त्यांच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधीस फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव शेट्टी आहे. आपल्या मागे पोलीस लागले होते म्हणून घाबरून पळत होतो असे त्या चोरट्याने पोलिसांना सांगितले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RBweXr