Full Width(True/False)

गरजू लोकांना ऑक्सिजन मिळावा यासाठी हर्षवर्धन राणे विकतोय त्याची बाईक

मुंबई : देशामध्ये आलेल्या करोनाच्या दुस-या लाटेमुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या वाढीमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला असून औषधे,रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन अशा आवश्यक गोष्टींची कमतरता जाणवत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असून त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी दारोदार फिरावे लागत आहे. या अशा बिकट परिस्थितीमध्ये अनेक कलाकार आपापल्या परीने मदत करत आहेत. अभिनेता देखील गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गरजू लोकांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याने एक मोठा निर्णय घेतला असून तो निर्णय आपल्या चाहत्यांबरोबर त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हर्षवर्धनने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या आवडत्या बाईकसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे, 'प्लीज कुणी तरी माझी ही विकत घ्या... त्या मिळणा-या पैशांतून मी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना मदत करीन...हैदराबादमध्ये मला चांगल्या गुणवत्तेचे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हवे आहेत....' दरम्यान,हर्षवर्धनने पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेन्ट करायला सुरुवात केली आहे. एका चाहत्याने लिहिले की,’तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो अगदी कौतुकास्पद आहे. तुमच्या बाईकला अधिक किंमत मिळावी असे तुम्हांला वाटत असेल तर त्यावर तुम्ही सही करा...’ चाहत्याने दिलेल्या या सूचनेवर हर्षवर्धननेही लगेचच रिप्लाय दिला असून, दिलेल्या सूचनेबद्दल आभार मानले आहेत. 'सनम तेरी कसम', 'पलटन' यांसारखे सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हर्षवर्धनने स्वतःचे असे स्थान निर्माण खेले आहे. 'बेजॉय नांबियारी की तैश' या वेब सीरिजमध्ये तो दिसला होता. ही वेब सीरिज झी ५ वर रिलीज झाली होती. गेल्यावर्षी करोनाची पहिली लाट जेव्हा आली होती तेव्हा हर्षवर्धनला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यावेळी त्याने 'तैश' या सिनेमाचे डबिंग केले होते. याबद्दल त्याने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ' जेव्हा तुम्ही २०० टक्के झोकून देतात तेव्हा तुमचे काम चांगलेच होते. त्यानुसार मी माझे काम केले काम भले मी आयसीयूमध्ये होतो तरी मला त्याने काही फरक पडणार नव्हता.' हर्षवर्धनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जॉन अब्राहमबरोबर तो आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाबद्दल जॉनने सांगितले होते की, आम्ही 'तारा बनाम बिलाल' नावाचा सिनेमाला सुरुवात करत आहोत. या सिनेमामध्ये हर्षवर्धन राणे आणि अंगिरा धर आहेत. त्यामुळे आता हर्षवर्धनाच्या या आगामी सिनेमाची प्रतिक्षा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/336AY9t