Full Width(True/False)

लॉकडाउनमध्ये फुल टाइमपास करायचाय?; खेळा 'हे' टॉप ५ मोबाइल गेम्स

नवी दिल्लीः देशात करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाउनसारखी स्थिती आहे. बाहेर फिरता येत नाही. राज्य वा केंद्र सरकारकडून लोकांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक कंपनीचे कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करीत आहे. लॉकडाउनमध्ये घरी बसून कंटाळा आला असेल किंवा टाइमपास करण्याचे काही साधन उपलब्ध होत नसेल तर तुम्ही हे मोबाइल मधील टॉप ५ गेम्स खेळून फुल टाइमपास करू शकतात. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः वाचाः critical Ops हे मोबाइलमध्ये अनेक गेमप्ले सोबत येतो. गेममध्ये पाच मोड आहेत. त्यात तुम्ही पिच करण्यात येणाऱ्या मॅप्सचे होस्ट आहात. तुम्ही कंट्रोल सेटिंग्सला बदलू शकतात. यात खूप साऱ्या आपल्या पसंतीची बंदुक सिलेक्ट करू शकतात. Crash Bandicoot On the Run क्रॅश बँडिकूट, गेमप्ले खूप बेसिक आहेत. याला तुम्ही तुमच्या कामात असताना सुद्धा खेळू शकतात. गेम डाउनलोड करण्यासाठी हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. Eternium या गेमला प्ले स्टोरवर ४.८ रेटिंग मिळाली आहे. गेममध्ये एक मोठी स्टोरीलाइन, सोपे कंट्रोल मिळते. सर्वात खास बाब म्हणजेच याला तुम्ही ऑफलाइन सुद्धा खेळू शकतात. CarX Drift Racing 2 सर्वात फेमस गेम्सपैकी एक हा गेम आहे. जो ६५ स्पोर्ट्स कारला अनलॉक करण्याची संधी देतो. गेम मध्ये खूप सारे कस्टमायजेशन उपलब्ध आहे. यात तुम्ही आपली कार क्लब सुद्धा बनवू शकतात. Inked जर तुम्हाला माउटेंन व्हॅली गेम पसंत असेल तर हा गेम तुमच्यासाठी बेस्ट गेम आहे. हँड क्राफ्ट पजल गेम पसंत पडू शकतो. या ठिकाणी तुम्हाला गेमच्या हिरोला गाइड करण्याची आवश्यकता आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3thkOVs