Full Width(True/False)

३२९ रुपयांत ८४ दिवस चालणारा प्लान, इंटरनेट डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः काही ग्राहकांना जास्त डेटाचा रिचार्ज प्लान पाहिजे. तर काही ग्राहकांना कमी किंमतीत जास्त दिवस चालणारा प्लान हवा आहे. अजूनही काही लोक फक्त आवश्यक डेटाचा वापर करतात. त्यांना फक्त जास्त कॉलिंग हवी आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच एका प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्यात कमी किंमतीत जास्त वैधता आणि फ्री कॉलिंग मिळते. यात डेटाची सुविधा सुद्धा आहे. वाचाः जिओचा ३२९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच जवळपास ३ महिने तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १ हजार एसएमएस दिले जातात. इंटरनेटवर ग्राहकांसाठी एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः Vi आणि Airtel चा ३७९ रुपयांचा प्लान एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे या सुविधेचा एक प्लान आहे. ज्याची किंमत ३७९ रुपये आहे. यात जिओप्रमाणे ८४ दिसवांची वैधता आणि ६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. वोडाफोन आयडियाचे प्लान मध्ये विकेंड डेटा रोलओवर, बिंज ऑल नाइट सोबत Vi movies and Tvचे फ्री अॅक्सेस दिले जाते. तर एअरटेलमध्ये कोणतीही आणखी सुविधा दिली जात नाही. वाचाः जिओचा १२९ रुपयांचा प्लान जर रिलायन्स जिओचा ३२९ रुपयांचा प्लान घेत नसाल तर कमी डेटा सोबत १२९ रुयपांचा प्लान सुद्धा येतो. १२९ रुपयांत जिओ ग्राहकांना २८ दिवसांची वैधता दिली जाते. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जाते. इंटरनेटसाठी ग्राहकांना एकूण २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uem4tK