Full Width(True/False)

महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलांच्या यादीत 'या' अभिनेत्रींनी मारली बाजी

- शशांक साने गेल्या काही वर्षांत नं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, प्रसन्न भाव चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. गेल्या वर्षी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. तेजश्री तिच्या अभिनयासाठी मोठ्या पडद्यावरही नावलौकिक मिळवत आहे. टीव्ही विश्वातली महाराष्ट्राची सर्वाधिक आकर्षक महिला ठरलेल्या तेजश्रीशी झालेल्या या गप्पा... टीव्ही विश्वातली महाराष्ट्राची सर्वाधिक आकर्षक महिला ठरल्यामुळे कसं वाटतंय? - खरोखरच खूप छान वाटतंय. ही अशी प्रेरणा प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते. हा किताब माझ्यासाठीही खूप प्रेरणादायी आहे; कारण यातूनच नव्यानं अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते. हा किताब म्हणजे माझ्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रेमाचं प्रतिबिंब आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत हा किताब माझ्यासाठी जणू एखाद्या सकारात्मक भेटीसारखा आणि चेहऱ्यावर हास्य खुलवणारा आहे. तुझ्या मते, तुझ्यात असे कोणते गुण आहेत, जे तुला सर्वाधिक आकर्षक बनवतात? - मला आकर्षक नव्हे; तर गोंडस ऐकण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ‘आकर्षक’ महिलेचा किताब माझ्यासाठी नवा आहे. व्यक्तिशः मला वाटतं, की मादक असणं म्हणजे आकर्षक असणं असं नाही. स्वतःमधली एक खास बाब तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं, आकर्षक बनवते. तो एक्स फॅक्टर प्रत्येकानं स्वतःमध्ये शोधायला हवा. सकारात्मक दृष्टिकोन आणि माझे स्पष्ट विचार, हे माझ्यातले गुण मला आकर्षक ठरवतात. तसंच चांगलं व्यक्तिमत्त्व आणि अभ्यासू वृत्ती हे माझ्यामध्ये असलेले गुण मला आकर्षक वाटतात. आपल्या देशातली सर्वाधिक आकर्षक महिला आणि पुरुष कोण आहेत, असं तुला वाटतं...आणि का? - अभिनेत्री दीपिका पदुकोण माझ्यासाठी सर्वाधिक आकर्षक आहे. तिचं सौंदर्य, प्रतिभा कौतुकास्पद आहे. पुरुषांमध्ये मला अभिनेता आमिर खान सर्वाधिक आकर्षक वाटतो. त्याचं व्यक्तिमत्त्व मला अधिक भावतं. आमिर स्वतःवर खूप मेहनत घेतो. आपल्या मराठी मनोरंजनविश्वात मला प्रिया बापट आणि उमेश कामत आकर्षक वाटतात. ते खूप विलक्षण आणि कमाल आहेत. तू बिनधास्त स्वभावाची आहेस, हा आत्मविश्वास तुझ्यात कुठून आला? - मी जे काही करते; त्याबद्दल मला खेद वाटत नाही. मला वाटतं, की त्यात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे, आपण न्यायाच्या बाजूनं आहोत. पुढं काय होणार याची चिंता मी करत नाही. स्वतःवर आणि स्वतःच्या कृतीवर मी विश्वास ठेवते. ही बाब मला मन:शांती देते आणि रात्रीची शांत झोपदेखील! प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची असते. हा किताब माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे; कारण यातूनच नव्यानं अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. हा किताब म्हणजे, माझ्यावर असणारं चाहत्यांचं आणि प्रेक्षकांचं प्रेम याचं ते प्रतिबिंब आहे. - तेजश्री प्रधान २. पल्लवी पाटील'ट्रिपल सीट', 'तू तिथे असावे', 'बॉइज २' या चित्रपटांतून तिच्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री पल्लवी पाटील नुकतीच 'जिगरबाज' या मालिकेत दिसली. या मालिकेत तिनं डॉक्टरची भूमिका साकारली होती. ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस अशा दोन्ही भूमिका ती चोख पार पाडू शकते. रिलेशनशिप स्टेटस : सिंगल ३. 'शिकारी' या सिनेमातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत नेहानं तिच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. सध्या ती 'देवमाणूस' या मालिकेत पोलिसाच्या भूमिकेत दिसतेय. तिचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर लक्षात येईल की, प्रत्येक पेहरावात ती तितकीच सुंदर दिसते. रिलेशनशिप स्टेटस : सिंगल ४. मिरा जगन्नाथ'जाडूबाई जोरात', 'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल्यानंतर मिरा सध्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारतेय. या मालिकेतील तिचं विनोदी अंगाकडे झुकणारं मोमो हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रिलेशनशिप स्टेटस : सिंगल ५. नयन मुकेरंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत काम करून नयनने स्वत:ला सिद्ध केलंय. 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेत तिनं लक्ष्मी देवीची भूमिका साकारली होती. अभिनयासह नयना फिटनेसप्रेमीही आहे. तसंच बॉडी पॉझिटिव्हिटीला पाठिंबा देणारी आहे. हे तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरुन नक्कीच लक्षात येईल. रिलेशनशिप स्टेटस : विनायक भोकरेसोबत विवाहबद्ध ६. रसिका सुनील'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत रसिकाने साकारलेली शनाया ही व्यक्तिरेखा गाजली. पण मालिका यशाच्या शिखरावर असताना तिने मालिकेचा निरोप घेतला आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी ती अमेरिकेला रवाना झाली. भारतात परतल्यावर ती पुन्हा शनाया हे पात्र साकारु लागली आणि त्याचं प्रेक्षकांनी स्वागत केलं. फिटनेसप्रेमी असलेली रसिका प्रशिक्षित स्कूबा डायव्हर आहे. रिलेशनशिप स्टेटस- आदित्य बिलागीसोबत रिलेशनशिपमध्ये ८. पूजा बिरारी'साजणा' आणि 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेतील पात्रांमुळे पूजा बिरारी हे नाव घराघरांत पोहोचलं. सध्या ती 'स्वाभिमान- शोध अस्तित्त्वाचा' या मालिकेत दिसत आहे. तिचा हट के लूक आणि दिलखुलास हास्य लोकांना घायाळ करतं. रिलेशनशिप स्टेटस- सिंगल ९. गौतमी देशपांडे'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेतील श्रुती या भूमिकेमुळे गौतमीला लोकप्रियता मिळाली. सध्या तिचं 'माझा होशील ना' या मालिकेतील सई हे पात्र गाजत आहे. या गुणी अभिनेत्रीला सुरेल गळा लाभला आहे. तसंच तिच्या हास्याचे अनेक चाहते आहेत. रिलेशनशिप स्टेटस- सिंगल ११. पूर्वा शिंदे काही वर्षांपूर्वी प्रिया वॉरिअरचे दिलखेचक हावभाव बघून प्रेक्षक वेडे झाले होते. त्यानंतर भुवयांच्या विशिष्ट हालचाली करणारा पूर्वाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ती 'लागिरं झालं जी' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली. रिलेशनशिप स्टेटस- सिंगल १३. पूर्णिमा डे'तुला पाहते रे' या मालिकेतील सोनिया या पात्राने पूर्णिमाला लोकप्रियता मिळवून दिली. ती अनेक जाहिरातींमध्ये चमकली आहे. तिने 'गॅटमॅट' आणि 'उन्मत्त' या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तिला सुरेल गळा लाभला आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील सुसल्या हे पात्र साकारल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या आणि सोशल मीडिया फॉलोअर्सच्या संख्येत भर पडली. रिलेशनशिप स्टेटस- सिंगल क्रमांक- नाव १. तेजश्री प्रधान २. पल्लवी पाटील ३. नेहा खान ४. मीरा जगन्नाथ ५. नयना मुके ६. रसिका सुनील ७. तन्वी मुंडळे ८. पूजा बिरारी ९. गौतमी देशपांडे १०. रुपाली भोसले ११. पूर्वा शिंदे १२. इशा केसकर १३. पूर्णिमा डे १४. विदुला चौगुले १५.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vAeb2t