Full Width(True/False)

करोना संकटः सॅमसंगकडून भारताला ३७ कोटी रुपयांची मदत

नवी दिल्लीः सॅमसंगने कोविड-१९ च्या सध्याच्या लाटीविरूद्धच्या भारताच्या लढ्यामध्ये योगदान म्हणून ३७ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील विविध राज्यातील हॉस्पिटलमधील आवश्यक सामूग्रीसाठी याची मदत होणार आहे. सॅमसंग ३ दशलक्ष यूएसडी केंद्र शासनाला तसेच उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांना दान देईल. वाचाः याव्यतिरीक्त, मागील काही आठवड्यांमध्ये तणावग्रस्त असलेल्या आरोग्यनिगा व्यवस्थेला मदत करण्यासाठी, सॅमसंग वैद्यकीय पुरवठ्यासाठी २ दशलक्ष यूएसडी देईल, ज्यामध्ये १०० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स, ३००० ऑक्सिजन सिलेंडर आणि एक दशलक्ष एलडीएस सिरींज यांचा समावेश असेल. हे सर्व उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांना दिले जाईल. एलडीएस किंवा लो डेड स्पेस सिरींज इंजेक्शन दिल्यानंतर डिव्हाईसमधील औषध शिल्लक रहाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे लस वापर अनुकूलित होतो. सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पादनांमध्ये वापरानंतर सिरींजमध्ये लसीचे मोठे प्रमाण शिल्लक राहते. या तंत्रज्ञानाने २०% जास्त कार्यक्षमतेचे प्रात्यक्षिक दिले आहे आणि जर सध्याची सिरींज एक दशलक्ष मात्रा देत होती, तर एलडीएस सिरींज लसीच्या त्याच प्रमाणासह १.२ दशलक्ष मात्रा देऊ शकते. या सिरींजची निर्मीती क्षमता वाढावी यासाठी सॅमसंगने मदत केली आहे. वाचाः सॅमसंग भारतामधील ५०,००० पात्र कर्मचारी आणि लाभार्थी यांसाठी लसीचे मूल्य देईल, लसीची मात्रा उपलब्ध होताच त्यांचे जीवन सुरक्षित करणे हा सॅमसंगचा उद्देश्य आहे. यामध्ये सॅमसंगचे अनुभवी सल्लागारांचा समावेश असेल, जे देशभरातील रिटेल इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरमध्ये काम करतात. सॅमसंग मध्ये, कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटूंबांना वैद्यकीय पुरवठ्याची माहिती आणि लाभ देणे तसेच रूग्णालय सुविधा आणि घरी निगा यांचा लाभ होण्यासाठी मदत म्हणून, आम्ही देशभरात इन-हाऊस सुविधा आणि टीमचा सेटअप केला आहे. एप्रिल २०२० मध्ये, सॅमसंगने महामारी विरूद्ध भारताच्या लढ्यासाठी २० कोटी मदत केली होती. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b5Lli2