Full Width(True/False)

CoWIN वर लस स्लॉट शोधण्यात अडचण येतेय ? 'हे' ट्रॅकर्स करतील मदत

नवी दिल्ली : देशातील सरकारने आता १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी कोविड लस सुरू केली आहे, त्यामुळे बर्‍याच लोकांना ही लस मिळणार असून यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तुम्ही सुद्धा लस घेण्याबद्दल विचार करत असालच. आपण सर्वात आधी लस घ्यावी किंवा आपल्याया आणि आपल्या कुटुंबियांना लस सर्वात आधी मिळावी याकरिता सगळेच प्रयत्नशील आहे. परिणाम स्वरूप, लससाठी स्लॉट देखील वेगाने भरत आहेत. याकरिता सर्वप्रथा कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल आणि त्याद्वारे तुम्हाला स्लॉट मिळतील. या पोर्टलवर स्लॉट शोधणे फार अवघड होत असून आणि त्यासाठी बराच वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत, पुढील बुकिंग स्लॉट केव्हा उपलब्ध आहे आणि जवळील लसी केंद्र कोठे उपलब्ध आहे हे लोकांना पाहण्यास मदत करण्यासाठी बर्‍याच साइट्स तयार करण्यात आल्या आहे. वाचा : ट्रॅकर ईमेल आणि इतर चॅटद्वारे मिळतो अलर्ट हे ट्रॅकर्स ईमेल आणि इतर चॅट सेवेद्वारे अलर्ट पाठवून लोकांना पुढील लसी भेटीची तपासणी करण्यास लोकांना मदत करत आहेत. या साइटवरून तुम्हाला फक्त लसीकरण भेटी आणि रिक्त स्लॉट्सबद्दल माहिती असेल.परंतु, कोविन पोर्टलचा उपयोग अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी करण्यात येईल आणि वेळ वाचेल. रिक्त स्लॉट्सच्या शोधात पोर्टल सर्फ करण्याची आवश्यकता नाही. महत्वाची बाब म्हणजे सध्या लसींचा साठा मर्यादित असल्याने वापरकर्त्यांना वेगाने काम करावे लागेल. घराजवळ वॅक्सीन अपॉइंटमेंट तपासून पाहा अमित अग्रवाल यांनी ट्रॅकर एक तयार केला आहे जो भारतात कोविड १९ लस ट्रॅकर म्हणून काम करतो. या ओपन सोर्स लस ट्रॅकरद्वारे लोक त्यांच्या घराजवळ लसीकरण केंद्राला भेट देऊ शकतात. रिक्त स्लॉट असल्यास हे ईमेलद्वारे त्यांचे निरीक्षण करण्यास आणि अलर्ट मिळविण्यात मदत करेल. Getjab.in देणारा जवळील स्थानांविषयी माहिती आयएसबीचे माजी विद्यार्थी श्याम सुंदर आणि त्याच्या मित्रांनी आणखी एक लस ट्रॅकर Getjab.in विकसित केले आहे. हे वापरायला सोपे असून यात आपल्याला आपले नाव, जिल्हा आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल. यानंतर ट्रॅकर आपल्या जवळच्या रिक्त स्लॉटबद्दल माहिती देईल. आणखी एक लस ट्रॅकर FindSlot.in आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे आपण शहर, जिल्हा, राज्य आणि पोस्ट कोडद्वारे नेव्हिगेट करू शकता. याद्वारे लोकांना उपलब्ध स्लॉट शोधण्यात मोठी मदत मिळते. Under45.in वरून लसीकरण केंद्र आणि रिक्त स्लॉट्स तपासा बर्टी थॉमसने अंडर Under45.in ट्रॅकर डिझाइन केले आहे. यामध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोक त्यांचे जवळचे लसीकारण केंद्र आणि रिक्त स्लॉट तपासू शकतात. तसे, सरकारी पोर्टलवरील सर्व रिक्त स्लॉट एकाच वेळी दिसतात. या वेबसाइटच्या माध्यमातून, लोकांचा त्रास कमी झाला आहे. यात केवळ १८-४४ वर्षे उपलब्ध लस केंद्र आणि स्लॉट देखील पाहू शकतात. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nV5Bbt