Full Width(True/False)

Money Heist 5 Teaser- प्रोफेसरच्या गँगचा होणार का अंत?

मुंबई: नेटफ्लिक्सची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज '' मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या वेब सीरिजचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता या वेब सीरिजचा पाचवा म्हणजेच शेवटचा सीझन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच नेटफ्लिक्सनं या वेब सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा करत या सीझनचा टीझरही रिलीज केला आहे. भारतासमवेत देशभरातील प्रेक्षक आणि चाहते या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अशात या सीझनचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटफ्लिक्सनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या वेब सीरिजच्या पाचव्या सीझनचा टीझर शेअर केला. यासोबतच त्यांनी 'मनी हाइस्ट'चा हा पाचवा सीझन २ भागांमध्ये प्रसारित केला जाणार असल्याचीही माहिती दिली आहे. दोन्ही भागांमध्ये ५-५ एपिसोड रिलीज केले जाणार आहेत. सीझन ५ चा पहिला भाग येत्या ३ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्यानंतर दुसरा भाग ३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या टीझरमध्ये, बँक ऑफ स्पेनमध्ये पोलिसांनी प्रोफेसरच्या गँगला घेरल्याचं दिसत आहे. चारही बाजूंनी बंदुकांची फायरिंग सुरू आहे. या क्राइम ड्रामा सीरिजच्या शेवटच्या सीझनमध्ये प्रोफेसरच्या गँगकडून सुरु असलेल्या रॉबरीचा शेवट होणार आहे. या सीझनमध्ये अभिनेता अल्वारो मोर्टे मास्टर माइंड प्रोफेसरच्या भूमिकेतून कमबॅक करत आहे. त्या व्यतिरिक्त उर्सुला कोरबेरो, इत्जियार इटुनो, मिगुएल हेरान, जॅमे लोरेंटे, एस्तेर एसेबो, डार्को पेरिक और एनरिक एर्स हे देखील या सीझनमध्ये दिसणार आहेत. मनी हाइस्ट ही एका मास्टर माइंड प्रोफेसरची कथा आहे. जो स्पेनमधील बँका लुटण्याची धोकादायक योजना आखतो आणि बऱ्याच अंशी त्यात यशस्वी सुद्धा होतो. आतापर्यंतच्या ४ सीझनमध्ये दाखवण्यात आलं आहे की, मास्टर माइंड प्रोफेसर आणि त्याची टीम बँका लुटण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण करतात. पण कशाप्रकारे ही पाहणं खूपच रंजक आहे. चौथ्या सीझनमध्ये ही कथा अर्ध्यावर संपवण्यात आली होती. जी आता पाचव्या सीझनमध्ये पूर्ण होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QMKsnG