मुंबई : सोनी टीव्हीवरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. लोकप्रियते बरोबरच हा कार्यक्रम सातत्याने अनेक वादांमध्येही अडकला आहे. कधी यातील स्पर्धकांमुळे तर कधी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. याही आधी अनेकदा वादात अडकलेला आहे. एक वाद संपतो तोच दुसरा वाद निर्माण होतो आणि तो पुन्हा चर्चेत येतो. एअरपोर्टवर घातला होता वाद आदित्य संदर्भात पहिला वाद निर्माण झाला तो २०१७ मध्ये. आदित्य विमानतळावरच्या एका स्टाफसोबत उद्धटपणे वागला होता. ही घटना रायपूर विमानतळावर घडली होती. आदित्यचे सामन ४० किलोपेक्षा जास्त होते. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला अतिरिक्त १३ हजार रुपये भरायला सांगितले होते. त्यावर आदित्यने तो १० हजारच भरणार असं म्हटलं. या मुद्द्यावरून आदित्य आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यात वाद झाला. या वादावेळी आदित्य कर्मचाऱ्यांसोबत अतिशय उद्धटपणे वागला इतकेच नाही तर त्याने या कर्मचाऱ्यांना धमकीही दिली होती. त्यावरून आदित्य खूपच चर्चेत आला होता. आदित्यला झाली होती अटक आदित्यचा हा वाद शमतो तोच लगेचच आणखी एका वादामध्ये तो अडकला. २०१८ मध्ये आदित्यने गाडी चालवताना एका ऑटो रिक्षाला ठोकर दिली होती. त्यात रिक्षात बसलेली प्रवासी महिला जखमी झाली. त्या महिलेने आदित्यविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी त्याला अटकदेखील केली होती. दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर आदित्यने त्या रिक्षा चालकाला आणि प्रवासी महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुलीने मारली होती कानाखाली केवळ इतकेच नाही तर २०११ मध्ये आदित्य नारायण आणखी एक वादामध्ये अडकला होता. आदित्य आणि त्याचा मित्र एका पबमध्ये गेले होते. तिथे या दोघांनी मद्यपान केले. मद्यपानाच्या नशेमध्ये आदित्यने तिथल्या एका मुलीवर आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यानंतर मुलीने आदित्यच्या कानाखाली मारल्याची बातमी आली होती. हा वाद खूपच चिघळला होता. टीआरपीसाठी नेहाबरोबर लग्नाचा ड्रामा इंडियन आयडल ११ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदित्य नारायण आणि नेहा कक्कड यांच्या प्रेम प्रकरणाची खूपच चर्चा रंगली होती. या कार्यक्रमाचा टीआरपी वाढावा यासाठी नेहासोबत लग्न करत असल्याचा ड्रामा त्याने केला होता. आदित्यने नेहासोबत सेटवरच सात फेरे घेत लग्न केल्याची अफवाही आली होती. हे ऐकून या दोघांच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला होता. परंतु काही दिवसांनी हे सारे नाटक होते आणि ते कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी रचले होते हे समोर आले. त्यानंतर नेहा कक्कडने रोहनप्रीत सिंगबरोबर लग्न केले तर आदित्य नारायणने श्वेता अग्रवालबरोबर लग्न केले. अमितकुमार यांच्याशीही वाद इंडियन आयडल १२ मध्ये किशोर कुमार यांच्यावर विशेष भाग प्रसारित झाला होता. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार आले होते. हा भाग प्रसारित झाल्यानंतर अमित कुमार यांनी या कार्यक्रमात येऊन 'स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी मला पैसे देण्यात आले होते', असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला होता. त्यानंतर 'तुमची नाराजी तेव्हाच सांगायला हवी होती', असे आदित्यने सुनावले होते. त्यानंतर या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेल्या कुमार सानू, रूपकुमार राठोड आणि अनुराधा पौडवाल यांनी स्पर्धकांचे कौतुक केले होते. त्यावेळी आदित्यने त्याने विचारले की, 'तुम्ही हे कौतुक स्वतःहून केले आहे की आम्ही तुम्हाला करायला सांगितले आहे', असा खोचक प्रश्न विचारला होता. त्यावरूनही प्रेक्षकांनी आदित्यला सोशल मीडियावर खूपच ट्रोल केले होते. आलिबाग वरून केले होते वादग्रस्त दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये एका स्पर्धकाने गाणे सादर केल्यानंतर त्याला आदित्यने काही गोष्टी सुनावल्या होत्या. या गोष्टी सुनावताना तो म्हणाला, 'रागदारीचा नीट अभ्यास करून येत जा... आम्ही काय अलिबागवरून येथे आलो आहोत का?' असे सुनावले. आदित्यने जाहीरपणे कार्यक्रमात असे वक्तव्य केल्यामुळे प्रेक्षकांना ही गोष्ट खूपच खटकली. या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्यने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. माफी मागितली नाही तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचा इशारा ही खोपकर यांनी दिला होता. त्यानंतर आदित्यने सोशल मीडियाद्वारे सर्वांची माफी मागितली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bWyW0C