मुंबई: टिव्ही अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची जोडी 'पवित्रा रिश्ता' मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली होती. या दोघांनी या मालिकेत अर्चना आणि मानव याभूमिका साकारल्या होत्या. केवळ मालिकेतच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांची ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती आणि त्यांचे लवकर लग्न व्हावे अशी सर्वांची इच्छा होती.'पवित्रा रिश्ता' या मालिकेत या दोघांच्या ही कामाचे भरभरून कौतुक केले, या भूमिकेमुळेच या दोघांना लोकप्रियता लाभली होती. गेल्यावर्षी जूनमध्येच सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या घटनेचा त्याच्या सर्व चाहत्यांना जबर धक्का बसला. आजही तो नाही, हे वास्तव त्याच्या चाहत्यांच्या पचनी पडलेले नाही. म्हणता म्हणता सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होणार आहे. सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्ताने अंकिताने त्याच्याशी संबंधित असलेल्या जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये अंकिता दिसत असून बँकग्राऊंडला एक गाणे सुरू असल्याचे ऐकू येत. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहे असून सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर 'पवित्र रिश्ता' कार्यक्रमाची एक जुनी क्लिप शेअर केली असून त्याच्या बॅकग्राऊंडला 'परिणिता' सिनेमातील 'पियू बोले पिया बोले' ऐकू येते. अंकिता या क्लिपमध्ये अर्चनाच्या भूमिकेत दिसते आहे. ती कधी इमोशनल दिसते आहे तर कधी रोमँटिक दिसते आहे. १४ जून २०२१ रोजी सुशांत सिंहचा पहिला स्मृतिदिन आहे. त्याच्याआधीच अभिनेत्रीचे पवित्र रिश्तामधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून या दोघांचे चाहते भावूक झाले आहेत.अंकिता आणि सुशांतची पहिली भेट एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमाच्या सेटवर झाली होती. कालांतराने या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. हे दोघेजण सहा वर्षे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. सुशांत सिंहच्या निदनानंतर अंकिता त्याच्या कुटुंबासोबत उभी राहिली होती आणि सुशांतला न्याय देण्यासाठीही तिने प्रयत्न केले. तेव्हा अंकिता विकी जैनसोबत रिलेशनमध्ये होती आता लवकरच या दोघांचे लग्न होणार आहे. अंकिता आणि विकी हे तीन वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, 'लग्न ही एक सुंदर अनुभूती आहे. मी माझ्या लग्नासाठी खूपच उत्सुक असून ते लवकरच होणार आहे. मला जोधपूर-जयपूर या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग करायची इच्छा आहे. अर्थात याबद्दल अजून काहीही निश्चित झालेले नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i3Ebza