Full Width(True/False)

देवमाणूस मालिकेचा हा शेवट नाही, येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: बोगस डॉक्टरचे भयानक कारनामे या कथानकावर आधारित असलेली '' मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. देवीसिंग अर्थात डॉक्टर अजित कुमार देव याच्या पापाचा घडा भरला असून तो लवकरच पोलिसांच्या सापळ्यात अडकणार असं म्हटलं जात आहे. डॉक्टर हाच देवीसिंग असल्याचं सर्वांसमोर यावं, यासाठी एसीपी दिव्या सिंग शक्य ते सर्व पुरावे गोळा करताना दिसत आहे. डॉक्टरविरोधात ती पुरावे गोळा करतेय. मालिकेचा हा शेवट असून मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यानं चाहत्यांमध्ये नाराजी होती. परंतु हा मालिकेचा शेवट नसून मालिकेत प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता मोठं वळण येणार असून अजित कुमार नक्की कोणती चाल खेळणार त्याचा प्लॅन काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.अजित कुमारचं खरं रूप सर्वांसमोर येण्यापूर्वी तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मालिकेत सध्या डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेता या मालिकेत मुख्यभूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून मालिकेतील इतर कलाकारही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे मालिका इतक्यात काही प्रेक्षकांना निरोप घेणार नाहीए. सत्य घटनेवर आधारीत या मालिकेबद्दची प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे. मालिकेसोबतच सरू आज्जी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Srfh1J