Full Width(True/False)

बॉलिवूडमध्ये टिकून राहायचं असेल तर.... संजय कपूर यांनी लेक शनायाला दिलाय 'हा' सल्ला

●० अभिनयाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्ही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आहात. आजवरच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? - मला चित्रपटसृष्टीत येऊन २६ वर्ष झाले आहेत. सुरुवातीच्या काळात काही रोमँटिक सिनेमे केले. प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्यात संक्रमणाचा काळ येतो. काहींबाबत ते घडतं तर काहींबाबत नाही. या काळात मला ज्या-ज्या सिनेमांसाठी विचारलं गेलं ते सगळेच मी केले असं नाही. मला चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या त्यावेळी मी मनाशी पक्कं ठरवलं की, चांगल्याच भूमिका स्वीकारेन नाही तर करणारच नाही. त्यावेळी मी 'लकबाय चान्स' सारखे मल्टीस्टारर सिनेमेसुद्धा केले. एका सिनेमाची निर्मिती केली. त्यानंतर 'लस्ट स्टोरीज' या सिनेमात काम केलं आणि माझ्या करिअरला वेगळं वळण मिळालं. माणसानं नेहमी तयार असावं. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर संधी मिळेल. मिळालेल्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं. ●० तुम्हाला काम मिळत नव्हतं त्यावेळी निराशेचे भाव मनात आले का?- मी नेहमी पाण्याच्या अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे बघत आलोय. 'लक बाय चान्स' या सिनेमातील माझ्या कामाचं कौतुक झालं पण त्यांनतर मला एकही चित्रपट मिळाला नाही. 'लस्ट स्टोरीज' या लघुपटामुळे माझ्या करिअरची दिशा बदलली. अनेकदा कौतुक होऊनही अपेक्षित चित्रपट मिळत नाहीत. असं का घडलं या विचारापेक्षा मेहनत करणं महत्त्वाचं. माझे वडील नेहमी सांगायचे, 'तुमच्या पुढे असलेल्यांकडे बघू नका. मागे असलेल्या आणि संधी न मिळणाऱ्या हुशार लोकांकडे बघा. तुम्हाला संधी तरी मिळतेय.' लोक कलाकारांना दोन वर्षांत विसरून जातात. माझा प्रवास तर २६ वर्षं इतका मोठा आहे. ●० '' या वेब सीरीजमधील पोलिसाचे पात्र साकारण्यासाठी काय विशेष तयारी केली?- अरुप हे पात्र चित्रपटांप्रमाणे सुपरपोलिसाचं नाही. हे पात्र सामान्य माणसाचंच आहे. त्याच्या मुलीत आणि त्याच्या नात्यात काही चढ-उतार आहेत. या साऱ्या पैलूंना समजून घेणं आव्हान होतं. पण आम्ही शूटिंग सुरू करण्याच्या आधी काही कार्यशाळा घेतल्या होत्या. या कार्यशाळेत मी माझ्या पात्राचं जग आणि पात्र असं दोन्ही गोष्टींना समजून घेतलं होतं. ० तुमची मुलगी; शनायाला तिच्या बॉलिवूडमधील करिअरसाठी तुम्ही काय सल्ला दिला?- शनायानं माझ्या करिअरला फार जवळून पाहिलं आहे. मला तिला काही सांगायची गरज नाही. तिने केवळ मलाच नाही तर आमच्या घरातील चित्रपटसृष्टीत असणाऱ्या सर्वांचं निरीक्षण केलं आहे. मी तिला एकच सांगतो की, चित्रपटसृष्टीत टिकून राहायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. आज तुम्हाला लवकर स्टारडम मिळालं; मात्र तुम्ही चांगले कलाकार नसाल तर तुमचं स्टारडम तितक्याच लवकर संपेल. करण इंडस्ट्रीत रोज नवे लोक येत आहेत. शब्दांकन : प्रथमेश गायकवाड


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3us10PN