Full Width(True/False)

'स्कॅम १९९२' नंतर प्रतीक गांधी दिसणार आणखी एका हटके भूमिकेत

मुंबई: सोनी लिव्हची वे सीरिज '' प्रचंड गाजली. शेअर मार्केट आणि घोटाळा यावर आधारित असलेल्या वेब सीरिजनं अभिनेता प्रतीक गांधीला रातोरात स्टार केलं. या वेब सीरिजमधील अभिनयामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला. त्यानंतर आता प्रतीक गांधी लवकरच नव्या वेब सीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याची आगीमी वेब सीरिज ''चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यामध्ये तो एका जुगार खेळणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'विठ्ठल तेडी' ही प्रतीक गांधीची नवी वेब सीरिज ओहो या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अभिषेक जैन दिग्दर्शित आणि भार्गव पुरोहित यांनी लिहिलेल्या या मालिकेत प्रतीक विठ्ठलची भूमिका साकारत आहे, जो खेड्यापाड्यात पैशासाठी पत्ते खेळतो आणि तो मोठ्या शहरांत फिरल्यानंतर नामांकित जुगारी होतो. प्रतीक गांधीनं स्कॅम १९९२ मध्ये केलेल्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं होतं. त्यानंतर त्याला बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर सुद्धा मिळू लागल्या आहेत. अशात त्याच्या या नव्या वेब सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. याच्या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. प्रतीक गांधीची ही आगामी वेब सीरीज 'विठ्ठल तिडी' गुजराती भाषेतील आहे. ही वेब सीरिज येत्या ७ मे ला रिलीज होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PHC34o