नवी दिल्ली : २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ३०० टक्क्यांनी वृद्धी झाल्याची माहिती ब्रँड पोको इंडियाने दिली आहे. आता हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड ठरला आहे. ब्रँडचा केवळ १० महिन्यात देशातील टॉप-३ ऑनलाइन स्मार्टफोन विक्रेत्यांमध्ये समावेश झाला आहे. पोको इंडियाचे कंट्री डायरेक्टर अनुज शर्मा याबाबत म्हणाले की, टकेवळ १० महिन्यात ऑनलाइन स्मार्टफोन स्पेसमध्ये टॉप-३ मध्ये समावेश होणे हे आमच्या प्रशंसक आणि ग्राहकांकडून मिळालेल्या प्रेम व विश्वासाचा पुरावा आहे. या विश्वासामुळे आम्ही २०२१ च्या पहिल्या तिमाही टॉप-१० स्मार्ट ब्रँडमध्ये सर्वाधिक वृद्धी करू शकलो. यामुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यास मदत झाली.' वाचा : गेल्यावर्षी आपल्या लाँचिंगच्या एक महिन्याच्या आतच १५ ते २० हजार रुपये किंमतीच्या सेगमेंटमध्ये फ्लिपकार्टवर सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला होता. देखील २० हजार किमंचीच्या सेगमेंटमध्ये लोकप्रिय ठरला होता. पोको सी३ आणि एम३ या किफायतशीर मॉडेलच्या आधारावर कंपनीने आपली ऑनलाइन स्थिती मजबूत केली आहे. कंपनीने माहिती दिली की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आलेल्या ने लाँचच्या ४५ दिवसाच्या आंत ५ लाख यूनिट्सची विक्री केली. अनुज शर्मा म्हणाले की, 'जसे आम्ही बाजारात पुढे जात आहोत, आमचे लक्ष्य डिव्हाइसच्या क्लाविटीशी तडजोड न करता सर्वश्रेष्ट आणि आकर्षक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे हा आहे.' वाचा : अनुज शर्मा म्हणाले की, 'टेकमध्ये लेगेसी ब्रँड सारखी कोणतेही गोष्ट नसते. अथवा आज देखील रिलेव्हेंट आहेत, कारण ते आजही दरवर्षी शानदार प्रोडक्ट लाँच करतात.शाओमी अद्याप चर्चेत आहे कारण त्यांनी Mi 11 अल्ट्रा आणि Mi मिक्स फोल्ड सारखे उत्पादन सादर केले. उपयोगी बनून राहण्यासाठी बदल करण्यासोबतच अपडेट राहणे गरजेचे आहे. केवळ एक प्रकारच्याच धोरणाने काम चालू शकत नाही.' पोको मर्यादित ग्राहकांसोबत काम करत आहे. याचे प्रोडक्ट सध्या केवळ ऑनलाइन विकले जात आहे. याचे कोणतेही रिटेल स्टोर नाही. याबाबत बोलताना शर्मा म्हणाले की, 'ऑफलाइन विस्तार करण्याचा सध्या देखील विचार नाही. लवकरच सर्व गोष्टी पूर्वपदावर येतील अशी अपेक्षा आहे.' टीम विस्ताराबाबत ते म्हणाले की, 'विस्तार सुरू असून, आम्ही हळूहळू यात पुढे जात आहोत. आवश्यकतेनुसार विस्तार करत आहोत.' वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uev5SB