Full Width(True/False)

७० हजाराचा स्मार्टफोन खरेदी करा फक्त २९,९९९ रुपयात, जाणून घ्या ऑफर

नवी दिल्लीः LG Wing स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तसेच मागच्या सेलमध्ये तुम्ही या फोनला खरेदी करू शकला नसाल तर तुमच्यासाठी आता एक जबरदस्त संधी आहे. एलजी विंगला देशात ६९ हजार ९९० रुपयांत लाँच करण्यात आले होते. परंतु, फ्लिपकार्टवरून या फोनला ४० हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. दरम्यान, एलजीने आपला मोबाइल बिजनेसला बंद करण्याची घोषणा आधीच केली आहे. कंपनी आपल्या स्टॉकमध्ये उपलब्ध असलेल्या फोन्सची विक्री करणार आहे. वाचाः फोनची भारतात किंमत आणि ऑफर्स फ्लिपकार्टवर एलजी विंग स्मार्टफोनला २९ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. म्हणजेच लाँच किंमतपेक्षा ४० टक्क्यांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. हँडसेटला ऑरोरा ग्रे आणि स्काय कलर ऑप्शनमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. फोनला सेल मध्ये खरेदी केल्यास एचडीएफसी क्रेडिट कार्ड सोबत १० टक्के (७५० रुपये), आणि एचडीएफसी डेबिट व क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे खरेदी केल्यास १० टक्के (१ हजार रुपयांपर्यंत) सूट मिळू शकते. याशिवा, स्मार्टफोनवर १४ हजार ६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा मिळणार आहे. हँडसेटला ५ हजार रुपये प्रति महिना नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करण्याची संधी आहे. वाचाः फोनची फीचर्स या फोनमध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080x2,460 पिक्सल) पी-ओलेड फुलविज़न डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, यात ३.९ फुल एचडी स्क्रीन दिली आहे. हँडसेटला ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. याला मायक्रोएसडी कार्ड द्वारे २ टीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सलचा सेकंडरी आणि १२ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर सेन्सर दिला आहे. एलजी विंग मध्ये सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ३२ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE-A, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, जीपीएस/ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहे. फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4000mA ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oZcid9