Full Width(True/False)

९० Hz आणि ४८ MP ने परिपूर्ण इन्फिनिक्स हॉट १० एसचे लॉन्चिंग आज, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली. इन्फिनिक्स हॉट १० एस इंडिया लाँचः स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्स आज आपला नवा बजेट स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. या फोनचे नाव इन्फिनिक्स हॉट १० एस आहे. हा फोन बजेटच्या श्रेणीत लाँच होईल अशी अपेक्षा अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. फोनचा नुकताच टीझर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर प्रसिद्ध करण्यात आला असून यातून फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले आहे . यात ४८ मेगापिक्सलचा सेन्सर आणि ९० हर्ट्झचा डिस्प्ले रिफ्रेश रेट असण्याची अपेक्षा आहे. जाणून घ्या फोनच्या संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल. वाचा : इन्फिनिक्स हॉट १० एसची संभाव्य किंमतः या फोनची किंमत १०,००० रुपयांपेक्षा कमी असू शकते. ते निळ्या, हिरव्या आणि जांभळ्या रंगांमध्ये उपलब्ध केले जाऊ शकते. ज्यांना कमी किंमतीत फोन खरेदी करायचा आहे त्यांच्याकरिता हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. इन्फिनिक्स हॉट १० एस ची संभाव्य वैशिष्ट्ये: लिस्ट नुसार फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा रीअर सेन्सर असेल. हा हँडसेट २४० fps स्लो-मो व्हिडिओ तयार करण्यास सक्षम आहे. हे बोकेह मोड आणि टाइम लॅप्स मोडमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. त्याचा डिस्प्ले H ० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. हा फोन मीडियाटेक हेलिओ जी ८५ प्रोसेसरने परिपूर्ण आहे. वापरकर्त्याला फोनमध्ये हीटिंग किंवा स्क्रीन स्टीयरिंगच्या अडचणी येणार नाही असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. संभाव्य वैशिष्ट्यांविषयी सांगायचे झाल्यास तर यात ६.८२ इंचचा एचडी + डिस्प्ले आहे. त्याचा टच सॅम्पलिंग दर १८० हर्ट्ज आहे. सेल्फी सेन्सरबद्दल बोसांगायचे झालयास, या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनचा मुख्य सेन्सर फक्त ४८ मेगापिक्सेलचा असेल. तर दुय्यम सेन्सर २ मेगापिक्सेल असण्याची अपेक्षा आहे. हा फोन Android ११ वर काम करतो. तसेच ६००० एमएएच बॅटरीसह सुसज्ज असेल. हा फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. प्रथम प्रकार ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येऊ शकतो. तर दुसरा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह लॉन्च केला जाऊ शकतो. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/341bieI