Full Width(True/False)

Noise Flair नेकबँड इयरफोन्स भारतात लाँच, किंमत ३९९९ रुपये, लाँच ऑफरमध्ये १७९९ रुपयांत

नवी दिल्लीः नॉइजने भारतात आपले नवीन नेकबँड ला लाँच केले आहेत. नेकबँडची खरी किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, हे डिस्काउंट सोबत उपलब्ध आहेत. डिस्काउंट नंतर नेकबँड इयरफोन्सची किंमत १ हजार ७९९ रुपये झाली आहे. कार्बन ब्लॅक, फॉरेस्ट ग्रीन, मिस्ट ग्रे आणि स्टोन ब्लू कलर ऑप्शनमध्ये या नेकबँडला अॅमेझॉन इंडिया आणि नॉइज इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकते. नेकबँडचे वजन ३७ ग्रॅम आहे. हे IPX5 वॉटर रजिस्टेंस सोबत येते. वाचाः नॉइज फ्लेयरचे फीचर दमदार साउंडसाठी नॉइज फ्लेयर नेकबँड मध्ये 10mm चे ड्राइवर्स दिले आहेत. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ व्हर्जन ५.० मिळणार आहे. नेकबँडची वायरलेस रेंज १० मीटर आहे. यात ऑटो पेयरिंग व ड्यूअल पेयरिंगचा सपोर्ट दिला आहे. नेकबँडचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात स्विफ्ट कॉलर टेक्नोलॉजी दिली आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने युजर कॉल व्हायब्रेशन अलर्ट मिळतो. या इयरफोन्सला फास्ट चार्जिग सपोर्ट करते. यात हँड्स फ्री कॉलिंग केली जाऊ शकते. वाचाः नाइज फ्लेयर नेकबँड मध्ये टच कंट्रोल्स दिले आहेत. ज्यात तुम्ही मीडिया आणि कॉल्सला कंट्रोल करू शकतात. नॉइज कन्सलेशनसाठी यात ड्यूअल मायक्रोफोन दिले आहेत. सिंगल चार्ज ७० टक्के व्हॅल्यूमवर ३५ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. हे लॅपटॉप ८ तासांपर्यंत बॅकअप देते. नेकबँडला पूर्ण चार्ज होण्यासाठी ४० मिनिट लागतात. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hER42H