मुंबई- बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यूसंबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने सुशांतचा मित्र याला अटक केली आहे. ही एनसीबीची मोठी कारवाई मानली जात आहे. सुशांतला ड्रग्ज पुरवण्यात सिद्धार्थचा सहभाग होता, असं म्हटलं जात आहे. यासोबतच सुशांतला मृत अवस्थेत पाहणारा सिद्धार्थ पहिला व्यक्ती होता. सिद्धार्थला एनसीबीने हैदराबाद येथून अटक केली आहे आणि लवकरच त्याला चौकशीसाठी मुंबईला आणण्यात येत आहे. सुशांतने १४ जून २०२० रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. परंतु, सुशांतच्या वडिलांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी करताना सुशांतला ड्रग्ज देण्यात येत असल्याचं स्पष्ट झालं होतं. सुशांतच्या मृत्युच्या वेळेस त्याच्या घरात उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी सिद्धार्थ एक होता. सिद्धार्थने सुशांतला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पहिल्यादा पाहिलं होतं आणि पोलिसांना कळवलं होतं. मागील वर्षीदेखील सिद्धार्थला सुशांतच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यासाठी अटक करण्यात आली होती. एनसीबीने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती. सिद्धार्थने गेल्या आठवड्यात केला साखरपुडा सिद्धार्थचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत यासंबंधीची माहिती दिली होती. त्याच्या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनी सिद्धार्थला ट्रोलही केलं होतं. सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एनसीबीने सिद्धार्थला अटक केली आहे. यापूर्वी सीबीआयनेदेखील सिद्धार्थची चौकशी केली होती. परंतु, त्यातून काहीही हाती लागलं नव्हतं. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा अजूनही पोलीस तपास सुरू आहे. सुशांतच्या अजून एका मित्राने केले लग्न सिद्धार्थशिवाय सुशांतचा आणखी एक मित्र सॅम्युअल हॉकिप यानेही लग्न केले. सॅम्युअलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे काही फोटो शेअर केले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uvBLfc