Full Width(True/False)

Oppo ने लाँच केले तीन नवीन पॉवरफूल स्मार्टफोन्स, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी ओप्पोने आपले तीन नवीन स्मार्टफोन Pro+, आणि Reno 6 ला लाँच केले आहे. तिन्ही फोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. तिन्हीमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Oppo Reno 6 Pro+ हे टॉप व्हेरिएंट असून यात Qualcomm Snapdragon ८७९ प्रोसेसर मिळतो. हा MediaTek Dimensity १२०० प्रोसेसर सोबत येतो. तर Oppo Reno 6 मध्ये MediaTek Dimensity ९०० प्रोसेसर आहे. वाचाः Oppo Reno ६ स्पेसिफिकेशन Oppo Reno 6 स्मार्टफोन अँड्रॉइड ११ वर आधारित ColorOS ११ वर चालतो. यात ९० हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेटसोबत ६.४३ इंच फूल एचडी+ होल पंच AMOLED डिस्प्ले मिळतो. फोन मीडियाटेक डायमेंशन ९०० प्रोसेसर आणि १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि २ मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये पॉवरसाठी ४३०० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी ६५ वॉट फास्ट चार्जिंगसोबत येते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. हँडसेट ७.५९ एमएम पातळ आणि १८२ ग्रॅम वजन आहे. वाचाः Oppo Reno 6 Pro चे स्पेसिफिकेशन नवीन Oppo Reno 6 Pro मध्ये थोडा मोठा ६.५५ इंचचा फूल-एचडी+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि दोन कॅमेरे प्रत्येकी २ मेगापिक्सलचे आहेत. पुढील बाजूला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. हा फोन ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी देतो. फोन ७.६ एमएम पातळ आणि याचे वजन १७७ ग्रॅम आहे. Oppo Reno 6 Pro+ चे स्पेसिफिकेशन Oppo Reno 6 Pro+ सीरिजचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन असून, हा अँड्राइड ११ वर आधारित ColorOS ११ वर चालतो. फोनमध्ये ९० हर्ट रिफ्रेश रेटसह ६.५५ इंच फूल एचडी+ ओलेड डिस्प्ले मिळतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर मिळेल. १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. हा फोन क्वाड कॅमेरा सेटअपसोबत येतो. मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल, दुसरा १६ मेगापिक्सल, तिसरा १२ मेगापिक्सल आणि चौथा २ मेगापिक्सलची लेंस आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यात देखील ४५०० एमएएचची बॅटरी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनचे वजन १८८ ग्रॅम आहे. Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro, Oppo Reno 6 Pro+ ची किंमत आणि उपलब्धता
  • Oppo Reno ६ च्या ८GB+१२८GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY २,७९९ (जवळपास ३१,८०० रुपये) आणि १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत CNY ३,१९९ रुपये (जवळपास ३६,४०० रुपये) आहे.
  • Oppo Reno 6 Pro च्या ८GB+१२८GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY ३,४९९ (जवळपास ३९,८०० रुपये) आणि १२ GB+२५६GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY ३७९९ (जवळपा ४३,२०० रुपये) आहे.
  • प्रीमियम Oppo Reno 6 Pro+ च्या ८GB+१२८GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY ३,९९९ (जवळपास ४५,५०० रुपये) आणि १२GB+२५६GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY ४,४९९ (जवळपास ५१,२०० रुपये) आहे.
  • सध्या तिन्ही फोन केवल चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या सीरिजच्या इतर देशांच्या लाँचिंगबाबत माहिती दिलेली नाही. मात्र रिपोर्टनुसार ही फोन सीरिज जुलैमध्ये भारतात उपलब्ध होईल.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fql0xV