मुंबई : अमेरिकन टीव्ही रिअॅलिटी स्टार आणि उद्योजिका चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. किम सातत्याने कोणत्या ना कोणत्या गोष्टीने चर्चेत असते. आपल्या सुखासीन अशा लाइफस्टाइलमुळे तर कधी बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी किमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे आणि कानात 'ओम'च्या डिझाइनचे कानातले घातलेले दिसत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. किमचा हा लूक आणि हा अंदाज काही युझर्सना अजिबात आवडलेला नाही. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे सांगत तिला ट्रोल करायला सुरुवात केली. किम सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. त्यामुळे तिने फोटो शेअर केल्यानंतर लगेचच व्हायरल होतात. त्यावर तिचे चाहते भरभरून लाइक आणि कमेन्ट करत असतात. परंतु सध्या तिने जे फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. तिच्या या फोटोंवर युझरने लिहिले, 'किम तू जे कानातले घातले आहे ते हिंदू धार्मियांचे प्रतिक आहे. ते अशा पद्धतीने घातले जाऊ शकत नाही...' तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, 'ओम हिंदूंसाठी एक पवित्र प्रतीक आहे आणि ती फक्त एक एक्सेसरीसाठी नाही आणि हे सांगण्यासाठी हा चांगला काळ आहे का?' आणखी एका युझरने लिहिले, 'हे सेलिब्रिटीज सांस्कृतिक प्रतीके अशा पद्धतीने वापरणे कधी थांबवतील? हे लाजिरवाणे आहे,' अशा अनेक प्रकारच्या कमेन्ट करत युझरनी किमला ट्रोल केले आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये, सिंधूर आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून फोटोशूट केल्याने किम कार्दशियन ट्रोल झाली होती. एवढंच नाही तर किम कार्दशियन घटस्फोटाच्या मुद्द्यावरून ही चर्चेत होती. किम आणि अभिनेता कान्ये वेस्ट यांनी १९ फेब्रुवारी २०२० रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना चार मुले आहेत. कान्ये वेस्टने किम कार्दशियनकडून मुलांच्या संयुक्त ताब्याची मागणी केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uvV1cF