Full Width(True/False)

YouTube Shorts ला ऑफलाइन पाहण्यासाठी 'असे' करा डाउनलोड, कोणत्याही Appची गरज नाही

नवी दिल्ली. YouTube वर व्हिडीओज बनविणाऱ्यांची संख्या खूप आहे. यात कंपनीने देखील नुकतेच यूट्यूब शॉर्ट्स प्रसिद्ध केले. परंतु ते अधिकृतपणे डाउनलोड करता येत नाही. ही प्रत्येकाचीच तक्रार. हे डाउनलोड न करता YouTube शॉर्ट्स चालवू इच्छित असल्यास, यासाठी इंटरनेट देखील आवश्यक आहे. अनेकदा मित्रांसह बसवून YouTube शॉर्ट्सचे व्हिडिओ शेयर करायचे असतात. पण, करता येत नाही. तुमच्या या समस्येचे आम्ही आज निराकरण करणार आहो. आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहो. ज्यांच्या मदतीने तुम्ही YouTube शॉर्ट्स डाउनलोड आणि शेयर करू शकाल. जाणून घ्या. वाचा : इन्स्टाग्राम रील्स, टिकटॉक आणि अन्य लहान व्हिडिओंविरूद्ध स्पर्धा करण्यासाठी YouTube शॉर्ट्स हे फीचर सुरु करण्यात आले. हे वैशिष्ट्य सध्या Android आणि वापरकर्त्यांसाठी बीटा आवृत्ती म्हणून अन्य देशांमध्ये उपलब्ध आहे. आधीच नमूद केल्यानुसार, YouTube शॉर्ट्स डाउनलोड करण्याचा कोणताही अधिकृत मार्ग नाही. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप किंवा वेबसाइटची मदत घ्यावी लागेल. अशा बर्‍याच वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स उपलब्ध आहेत पण येथे आम्ही शॉर्ट डाउनलोडरबद्दल सांगत आहोत जे सर्व ब्राउझरवर व्यवस्थित काम करेल. असे डाउनलोड करा YouTube शॉर्ट्स, वापरा या टिप्स
  • प्रथम आपल्या Android फोनवर YouTube App उघडा.
  • यानंतर, खाली मुख्यपृष्ठ स्क्रीनच्या पुढे दर्शविलेल्या शॉर्ट्स पर्यायावर जा.
  • डाउनलोड करू इच्छित शॉर्ट्स उघडा.
  • यानंतर, शेअर चिन्हावर क्लिक करून लिंक कॉपी करा.
  • आता आपल्या फोनचा ब्राउझर उघडा जो डाउनलोडला समर्थन देतो.
  • शॉर्ट डाउनलोडर वेबसाइटवर जा आणि यूट्यूब शॉर्ट्सचा लिंक येथे पेस्ट करा.
  • यानंतर, शोधा वर क्लिक करा.
  • आपल्याला YouTube शॉर्टकटचे स्वरूप दिसेल. ते निवडा आणि व्हिडिओ डाउनलोड करा.
वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3udwOrq