नवी दिल्लीः स्मार्टफोनला १९ मे रोजी ग्लोबली लाँच करण्यासाठी कंपनीने तयारी केली आहे. लाँच आधीच कंपनीने या अपकमिंग स्मार्टफोनचे फीचर्सची माहिती उघड केली आहे. कंपनीने सांगितले की, या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस (1080x2400 पिक्सल रेजॉलूशन) डॉट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यासोबतच कंपनीने सांगितले की, या फोनमध्ये खास डायनामिक स्विच सुद्धा दिले जाणार आहे. वाचाः पोको M3 मिळू शकतात हे फीचर्स फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस IPS डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिस्प्लेचाआस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये कंपनी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत स्लिम बेजल डिझाइन ऑफर करू शकते. पोकोच्या या फोनमध्ये रियर पॅनेलमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. वाचाः पोको M3 प्रो ६ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज सोबत येऊ शकते. प्रोसेसर म्हणून यात मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट ऑफर केला जाऊ शकतो. हा फोन प्री-इंस्टॉल्ड अँड्रॉयड 11 ऑपरेटिंग सिस्टम सोबत येऊ शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ५ जी शिवाय, वाय फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक, यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे फीचर दिले जाऊ शकतात. या फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RoowiW