Full Width(True/False)

सॅमसंगने लाँच केले तीन नवीन लॅपटॉप, ३६० डिग्री फिरणार स्क्रीन

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची दिग्गज टेक कंपनी सॅमसंग इलेक्ट्रिक्सने सीरिजमधील तीन नवीन लाँच केले आहेत. कंपनीने जागतिक बाजारात Galaxy Book, आणि ला लाँच केले आहे. तिन्ही लॅपटॉप पोर्टेबल आहेत व शानदार एमोलेड डिस्प्ले सोबत येतात. वाचाः Galaxy Book गॅलेक्सी बुक एक स्लिम मॉडेल असून, मागील व्हेरिएंटच्या तुलनेत यात काही बदल करण्यात आले आहेत. या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच कंफर्टेबल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात व्ह्युइंग एक्सपिरियन्स अधिक चांगला देण्यासाठी अँटी-ग्लेयर फंक्शनालिटी देण्यात आली आहे. १७० वाइड व्ह्युइंग अँगलसोबत गॅलेक्सी बुकमध्ये हाय-लेव्हल एक्सपिरियन्स मिळतो. हा लॅपटॉप दोन रंगात उपलब्ध आहे. लॅपटॉपची किंमत मेमेरी, सीपीयू आणि इतर फीचर्सच्या आधारावर ८६० डॉलर ते १४६५ डॉलरपर्यंत जाते. Galaxy Book Pro Galaxy Book Pro देखील एक स्लिम आणि पोर्टेबल लॅपटॉप आहे. गॅलेक्सी बुक सीरिजमधील हे आतापर्यंतचे सर्वात पातळ आणि हल्के मॉडेल आहे. यात मोबाइल ऑफिस, मूव्ही थिएटरसाठी आवश्यक असणारे सर्व फीचर्स देण्यात आले आहेत. तीन रंगात येणाऱ्या गॅलेक्सी बुक प्रो ची किंमत ११५३ डॉलर पासून ते १,९०७ डॉलरपर्यंत आहे. वाचाः Galaxy Book Pro 360 Galaxy Book Pro 360 हा एक मल्टी पर्पज लॅपटॉप आहे, जो एस पेन फंक्शनालिटीसोबत येतो. हा अल्ट्रा-स्लिम लाइटवेट डिव्हाइस आहे. गॅलेक्सी बुक प्रो ३६० हा गॅलेक्सी बुक सीरिजच्या डिव्हाइसेजमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी देते. म्हणजेच, यूजर सहज स्मार्टफोन ते नोटबुक, टॅबलेट किंवा वियरबेल डिव्हाइसमध्ये सहज स्विच करू शकता. या सीरिजमध्ये Quick Share, Gallery, Second Screen सारखे फीचर्स येतात. लॅपटॉपद्वारे ५ डिव्हाइसला इंटरकनेक्ट करता येते. नावाप्रमाणेच या लॅपटॉपमध्ये ३६० डिग्री रोटेशनचे फीचर देण्यात आले आहे. म्हणजेच याचा वापर टॅबलेटप्रमाणे देखील करता येईल. यासोबतच यात मिळणाऱ्या एस पेनसोबत अनेक कामे करता येतील. या एस पेनला चार्जिंग करण्याची देखील आवश्यकता नाही. १५.६ आणि १३.३ इंच स्क्रीनसह येणारा हा लॅपटॉप ३ रंगात उपलब्ध आहे. याची किंमत १,६०५ डॉलर ते २,४३० डॉलर आहे. कंपनीनुसार, या लॅपटॉपला २१ मे पासून खरेदी करता येईल. याशिवाय ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीवर अनेक डिस्काउंट आणि ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fnGx94